सोशल मीडिया युझर्समध्ये इंस्टंट मेसेजिंग अॅप असलेले व्हॉट्स अॅप (Whatsapp) हे एक लोकप्रिय ॲप आहे. या ॲपमधील फिचर हे संवादात सुलभता आणते. चॅटिंग, व्हिडीओ कॉल, फोटो आणि व्हि़डीओ शेअरिंग असे बरेच फायदे आपल्याला व्हॉट्स अॅपचे होत असतात. नुकतचं व्हॉट्स अॅपच्या युझर्सना आणखी एक खुशखबर आहे. आता आपल्या व्हॉट्स अॅपवर पोल (Whatsapp Poll) घेवू शकतात.
Whatsapp Poll : व्हॉट्स अॅप पोल फिचर
गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्स अॅपने व्हॉट्सअॅप वेब युझर्ससाठी एक इंटरनेटशिवाय मेसेज हे नवीन फिचर आणले होते. या फिचरला अल्पावधीत लोकप्रियता मिळाली. नुकतचं व्हॉट्स अॅपच्या अपकमिंग माहिती देणारे व्हॉट्स अॅपचे पेज WABetaInfo नुकतंच जाहीर केले आहे की, व्हॉट्सअॅपवर आता तुम्ही पोल (WhatsApp Poll) घेवु शकता. यापूर्वी ही सुविधा टेलिग्राम या मेसेजिंंग अॅपवर (Telegram Poll) आहे. आता व्हॉट्स अॅपवरही ही सुविधा मिळणार आहे.
WABetaInfo जे व्हॉट्स अॅपच्या आगामी फिचर संबधात माहिती देत असते. त्याच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्स अॅप हे व्हॉट्सअॅप पोल (Whatsapp Poll) या नव्या फिचरवर काम करत असून, लवकरचं युझर्सना उपलब्ध हाेणार आहे. हे फिचर फक्त व्हॉट्स अॅप ग्रुपसाठी उपल्बध असणार आहे. ग्रुपमधील सदस्यच या पोलमध्ये सहभाग नोंदवू शकतात. एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड (end-to-end encrypted) असलेले हे फिचर सुरूवातीला iOS प्लेटफॉर्मवर उपलब्ध केले जाणार आहे. काही दिवसांनी ते नंतर ते Android आणि डेस्कटॉप यूझर्ससाठी उपलब्ध केले जाणार आहे.