WhatsApp चे नवीन फिचर! अनोळखी व्यक्तीने फोन का केला? कॉल उचलण्यापूर्वीच स्क्रीनवर दिसणार

व्हॉट्सॲप युजर्सची प्रायव्हसी आणि कॉलिंग अनुभव अधिक सुरक्षित करण्यासाठी सातत्याने नवनवीन फीचर्स सादर करत आहे. नवीन फीचरमुळे आता अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास ॲप स्वतः समोरच्या व्यक्तीला फोन करण्याचे कारण विचारेल.
WhatsApp
WhatsApp File Photo
Published on: 
Updated on: 

WhatsApp new feature:

नवी दिल्ली: व्हॉट्सॲप आपल्या कोट्यवधी युजर्सची प्रायव्हसी आणि कॉलिंग अनुभव अधिक सुरक्षित करण्यासाठी सातत्याने नवनवीन फीचर्स सादर करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने 'सायलंट अननोन कॉलर्स' हे फीचर आणले होते. आता मात्र यात अधिक सुधारणा केली जात असून एक अत्यंत उपयुक्त सेफ्टी टूल विकसित केले जात आहे. व्हॉट्सॲपच्या या फीचरमुळे आता अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास ॲप स्वतः समोरच्या व्यक्तीला फोन करण्याचे कारण विचारेल.

विशेष म्हणजे, युजर्सना समोरच्या व्यक्तीच्या उत्तराचा संभाषणाचा मजकूर स्क्रीनवर वाचायला मिळणार आहे. यामुळे तो कॉल महत्त्वाचा आहे की एखादा फेक कॉल आहे, हे ओळखून युजरला कॉल उचलायचा की कट करायचा, याचा निर्णय घेता येईल. सध्या हे फीचर अँड्रॉइड व्हर्जनसाठी डेव्हलपमेंट टप्प्यात आहे. व्हॉट्सॲपच्या कॉल फिल्टरिंग सिस्टमचा भाग म्हणून हे फीचर काम करेल. अद्याप बीटा टेस्टर्ससाठी ते उपलब्ध करण्यात आले नसून कंपनीने याच्या रोलआउटची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.

WhatsApp
Boss Fraud WhatsApp Scam: बॉसच्या व्हॉट्सॲपवरून मेसेज अन् खात्यातून पैसे गायब! ‘सीईओ फ्रॉड’पासून सावध राहा

कॉल फिल्टरिंगमध्ये मिळणार ३ पर्याय

रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी सेक्शनमधील कॉल फिल्टरिंग मेन्यूमध्ये युजर्सना ३ नवीन ऑप्शन्स पाहायला मिळतील. पहिला पर्याय 'Never': हा पर्याय निवडल्यास कॉल फिल्टरिंग पूर्णपणे बंद राहील आणि सर्व कॉल्स नेहमीप्रमाणे सामान्य पद्धतीने येतील.

दुसरा पर्याय 'Silence': यामुळे अज्ञातांच्या नंबरवरून येणाऱ्या कॉल्सची रिंग वाजणार नाही. मात्र, त्या कॉल्सची माहिती युजर्सना 'कॉल टॅब' आणि नोटिफिकेशनमध्ये दिसेल. तिसरा पर्याय 'Ask reason for calling': हा पर्याय निवडल्यास व्हॉट्सॲप अनोळखी कॉलरला फोन करण्याचे कारण विचारेल. उत्तर मिळाल्यानंतर युजर कॉल स्वीकारायचा की नाही, हे ठरवू शकतील.

स्क्रीनवर दिसेल टेक्स्ट ट्रान्सक्रिप्ट

या नव्या फीचरचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, कॉलरने दिलेल्या उत्तराचा टेक्स्ट ट्रान्सक्रिप्ट युजरला मोबाईल स्क्रीनवर वाचता येईल. यामुळे थेट कॉल न उचलता किंवा कॉलरशी न बोलताही फोन महत्त्वाच्या कामासाठी आला आहे की तो स्पॅम कॉल आहे, हे सहज स्पष्ट होईल. सायबर फ्रॉड आणि स्पॅम कॉल्सच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी हे फीचर अत्यंत प्रभावी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

WhatsApp
EPFO WhatsApp Channel: 'Hello' पाठवा अन् व्हॉट्सॲपवर मिळवा PF चे सर्व अपडेट्स! EPFO चे अधिकृत चॅनल कसे जॉईन करावे?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news