EPFO WhatsApp Channel: 'Hello' पाठवा अन् व्हॉट्सॲपवर मिळवा PF चे सर्व अपडेट्स! EPFO चे अधिकृत चॅनल कसे जॉईन करावे?

EPFO ने आपले अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल सुरू केले आहे. या चॅनलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना नव्या घोषणा, योजना, महत्त्वाच्या तारखा आणि विविध उपक्रमांचे थेट अपडेट्स मोबाईलवर मिळत आहेत.
EPFO PF Withdrawal
EPFO PF WithdrawalPudhari
Published on: 
Updated on: 

EPFO WhatsApp Channel

नवी दिल्ली: नोकरदारांसाठी पीएफ (PF), पेन्शन आणि विम्याशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळवणे आता अधिक सोपे आणि सुलभ झाले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपले अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल सुरू केले आहे. या चॅनलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना नव्या घोषणा, योजना, महत्त्वाच्या तारखा आणि विविध उपक्रमांचे थेट अपडेट्स मोबाईलवर मिळत आहेत. अवघ्या काही दिवसांतच या चॅनलच्या फॉलोअर्सची संख्या २ लाखांच्या पार पोहोचली आहे.

या चॅनलचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ नियम आणि सरकारी योजनांची माहितीच दिली जात नाही, तर त्या समजून घेण्यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ आणि ट्युटोरिअल लिंक्सही शेअर केल्या जातात. यामुळे कर्मचाऱ्यांना पीएफचे नियम समजून घेण्यासाठी विविध संकेतस्थळांची गरज उरणार नाही.

EPFO PF Withdrawal
EPFO UPI withdrawal: पीएफ खात्यातून पैसे काढणे आणखी सोपे; आता थेट युपीआयद्वारे बँक खात्यात जमा होणार; काय आहे नवीन नियम?

व्हॉट्सॲप चॅनलवर काय-काय माहिती मिळणार?

EPFO च्या या अधिकृत चॅनलवर प्रामुख्याने तीन प्रमुख योजनांविषयी सविस्तर माहिती दिली जात आहे.

ईपीएफ (EPF - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी): पीएफमधील योगदान, खात्यातून ॲडव्हान्स रक्कम काढण्याची प्रक्रिया व इतर अपडेट्स.

ईपीएस (EPS - कर्मचारी पेन्शन योजना): पेन्शनशी संबंधित नियम व योजनांची इत्यंभूत माहिती.

ईडीएलआय (EDLI - कर्मचारी जमा संलग्न विमा योजना): कर्मचाऱ्यांना मिळणारे विमा लाभ आणि त्यासंबंधीचे नियम.

याशिवाय, EPFO चे नवीन निर्णय, तक्रार निवारण शिबिरांची माहिती आणि महत्त्वाच्या तारखांचे अपडेट्सही यावर उपलब्ध होतील.

प्रक्रिया समजून घेण्यासाठी व्हिडिओ व ट्युटोरिअल्स

कर्मचाऱ्यांना पूर्णपणे माहिती मिळावी यासाठी, ईपीएफओ चॅनेल उपयुक्त व्हिडिओ आणि ट्युटोरियल्स शेअर करते. यामध्ये पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम कशी काढावी, नवीन नोकरी सुरू करताना पीएफ योगदानाबाबतचे नियम आणि 'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना' यांसारख्या विषयांवरील मार्गदर्शक माहितीचा समावेश आहे.

व्हॉट्सॲपवरून थेट पीएफचा पैसा काढता येईल का?

कर्मचाऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, हे व्हॉट्सॲप चॅनल सध्या केवळ माहिती आणि जनजागृतीसाठी सुरू करण्यात आले आहे. म्हणजेच, व्हॉट्सॲपवरून थेट पीएफ शिल्लक तपासणे, रक्कम काढण्याचा अर्ज करणे किंवा पेन्शन-विम्याचा क्लेम दाखल करता येणार नाही. या कामांसाठी कर्मचाऱ्यांना नेहमीप्रमाणे EPFO चे अधिकृत पोर्टल, 'उमंग' ॲप किंवा प्रादेशिक कार्यालयाचाच वापर करावा लागेल.

EPFO चे व्हॉट्सॲप चॅनल कसे जॉईन करावे?

तुमच्या मोबाईलमध्ये WhatsApp ओपन करा.

ॲपमधील Updates सेक्शनमध्ये जा.

Channels पर्यायामध्ये जाऊन Explore वर क्लिक करा.

सर्च बॉक्समध्ये EPFO टाईप करा.

संघटनेचे अधिकृत चॅनल निवडून Follow वर क्लिक करा.

EPFO PF Withdrawal
PF Withdrawals : पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम काढणे शक्य; पीएफ २.१ प्रणाली लागू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news