What's App File Download Scam: फाईल डाऊनलोड केली अन् CA ला बसला ७५,००० रूपयांचा फटका, पोलिसांनी गुन्हेगारांचा कसा शोध लावला?

फ्रॉड करणाऱ्याने व्हॉट्स अॅप लिंकद्वारे सीएच्या या क्रेडिट कार्डवरून ऑनलाईन खरेदी केली.
What's App File Download Scam
What's App File Download Scampudhari photo
Published on
Updated on

Whats App File Download Scam: एक भयंकर सायबर फ्रॉड समोर आला आहे. दिल्लीतील एका चार्टर्ड अकाऊंटन्टने व्हॉट्स अॅपवर आलेली क्रेडिट कार्ड लिमीट वाढून देण्याचे आश्वासन देणारी एक फाईल डाऊनलोड केली. ही फाईल डाऊनलोड करताच त्यांना तब्बल ७५ हजार ६९४ रूपयांचा फटका बसला.

दिल्लीतील हे सीए कोटक महिंद्रा बँकेचे क्रेडिट कार्ड वापरतात. फ्रॉड करणाऱ्याने व्हॉट्स अॅप लिंकद्वारे सीएच्या या क्रेडिट कार्डवरून ऑनलाईन खरेदी केली. हा एक नवा सायबर फ्रॉड असून यापासून लोकांनी सावध रहायला हवं.

What's App File Download Scam
Cabinet Meeting: अजितदादांनी सांगितलेल्या ३ महत्वाच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब

सीए फसले कसे?

तपासत असं आढळून आलं की ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या गँगचा सदस्य हा यापूर्वी क्रिडिट कार्डच्या कंपनीत काम करत होता. त्यामुळं त्याच्याकडे ग्राहकांच्या डाटाचा अॅक्सेल होता. त्यानं याच माहितीचा गैरवापर केला. त्यानं कोटक महिंद्रा बँकेचे एक फेक अॅप तयार केलं. त्यानं त्याद्वारे एक बोगस APK फाईल तयार केली.

त्याने एक फेक सीम कार्ड वापरून आपण बँक अधिकारी असल्याचं ग्राहकाला भासवलं. त्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीला APK फाईल डाऊनलोड करण्यासाठी मनवलं. त्यानं क्रेडिट कार्डचे लिमीट वाढवण्याचं लालुच त्यांना दाखवलं होतं.

What's App File Download Scam
CM Devendra Fadnavis | राष्ट्रनिर्मितीसाठी 'अनुलोम'चे कार्य मोलाचे; येवल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वयंसेवकांचा गौरव

ज्यावेळी पीडित ग्राहकानं व्हॉट्स अॅपमधीलमधील ती फाईल डाऊनलोड केली. त्यानंतर या फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीला पीडित ग्राहकाच्या मोबाईल फोन आणि क्रेडिट कार्ड डिटेल्सचा संपूर्ण अॅक्सेस मिळाला. त्यानंतर त्यांनी झेप्टोची अॅप लिंक वापरून अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या. या वस्तू फरिदाबादमध्ये डिलिव्हर झाल्या. त्यानंतर या वस्तू olx वर विकण्यात आल्या.

What's App File Download Scam
Cyber insurance India: सायबर हल्ल्यांचा धोका वाढतोय; भारतीय कंपन्यांचा सायबर विम्याकडे वाढता कल

पोलिस गँगपर्यंत कसे पोहचले?

दरम्यान, पीडित सीएने ४ फेब्रुवारी रोजी सायबर पोलिसांकडे याबाबतची तक्रार दिली होती. त्यानंतर साबयर सेलने विशेष ऑपरेशन टीम तयार केली. तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर जिथं या वस्तू डिलिव्हर झाल्या आहेत ते लोकेशन ट्रॅक करण्यात आले. ही लोकेशन लखीमपूर गावातील सुरजकुंड येथील होती.

यानंतर पोलिसांनी चार लोकांना अटक केली आणि त्यांच्याकडून मोबाईल फोन देखील हस्तगत करण्यात आला. अटक केलेल्यांमध्ये अभिषेक कुमार झा(२४), आशिष कुमार ओझा(२३), विवेक कुमार उर्फ मोनू (३७) आणि इकरार (२३) यांना अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news