Cyber insurance India: सायबर हल्ल्यांचा धोका वाढतोय; भारतीय कंपन्यांचा सायबर विम्याकडे वाढता कल

खंडणी, डेटा चोरी आणि कामकाज ठप्प होण्याच्या पार्श्वभूमीवर सायबर संरक्षण विमा ठरत आहे जोखीम व्यवस्थापनाचा महत्त्वाचा आधार
Cyber insurance India
Cyber insurance IndiaPudhari
Published on
Updated on

पुणे : अलिकडील काळात बहुसंख्य भारतीय कंपन्या जोखीम व्यवस्थापनेचा एक अविभाज्य भाग म्हणून सायबर संरक्षण विमाकवचाचा आधार घेऊ लागल्या असून, त्यांची संख्या वाढत आहे, अशी माहिती एडमे इन्श्युरन्स बोकर्सचे व्यवस्थापकीय संचालक नोचिकोता दीक्षित यांनी दिली.

Cyber insurance India
Addiction as Social Issue: व्यसनमुक्ती ही सामाजिक न्यायाची लढाई; केवळ कुटुंबाची नव्हे तर समाजाची जबाबदारी – न्या. अभय ओक

दीक्षित यांनी दिलेल्या तपशिलानुसार, सायबर हल्ल्याद्वारे कंपन्यांकडून मोठी रक्कम खंडणीच्या रूपात वसूल करण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. बँकिंग, आयटी सेवा, मॅन्युफॅक्चरिंग, एनर्जी, फार्मास्युटिकल्स, लॉजिस्टिक्स इत्यादी महत्त्वाच्या क्षेत्रात अत्याधुनिक पद्धतीने सायबर हल्ल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. हल्लेखोर क्लाउड इन्फास्ट्रक्चर, व्हेंडॉर इकोसिस्टिम आणि कर्मचाऱ्यांच्या इंडपॉइंट्‌‍समधील त्रुटी शोधून काढून त्याचा वापर एंटरप्राइज व्यवस्थेत घुसखोरी करण्यासाठी करतात, त्यामुळे कामकाज विस्कळीत होते.

Cyber insurance India
Harshada Bhosale Corporator PMC: पाच वर्षांत वारजेचा सर्वांगीण विकास; मूलभूत समस्या सोडविण्याचा हर्षदा भोसले यांचा निर्धार

या पार्श्वभूमीवर आधुनिक सायबर विमा पॉलिसीज सायबर हल्ल्यानंतर उद्भवणाऱ्या प्रमुख खर्चाचे संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. ‌’एडमे इन्श्युअरन्स बोकर्स‌’ने यूकेस्थित ‌’यू आय बी रिइन्शुरन्स बोकर्स‌’च्या इंडिया ऑपरेशन्सचा भाग आपल्या कंपनीत विलीन केला असून, त्यानिमित्त दीक्षित यांनी हा उल्लेख केला. एका आघाडीच्या मल्टिनॅशनल कॉर्पोरेशन इन्शुरन्स बोकरेज कंपनीचे भारतीय कंपनीने संपादन करण्याची ही पहिलीच घटना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news