

Delhi NCR earthquake today
टेक न्यूज : दिल्ली-एनसीआरमध्ये आज (दि.१०) सकाळी भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी 4.1 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या धक्यांमुळे अनेकजण घरांमधून व कार्यालयांमधून बाहेर पडले. मात्र, काही नागरिकांना याची अजिबात जाणीव झाली नाही. यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे मोबाईल फोनवर कोणत्याही प्रकारचा भूकंपाचा अलर्ट न येणे.
गूगलने अँड्रॉइड फोनसाठी तयार केलेले Earthquake Alerts हे एक विशेष फिचर आहे. हे फिचर फोनमध्ये Safety & Privacy सेटिंगमध्ये उपलब्ध आहे. एकदा हे ऑन केल्यास, भूकंप झाल्यास फोनवर सायरनसह इशारा दिला जातो, तसेच स्क्रीनवर आपत्कालीन सूचना देखील दाखवल्या जातात.
याचे साधे उत्तर म्हणजे गूगल अलर्ट केवळ 4.5 किंवा त्याहून अधिक तीव्रतेच्या भूकंपासाठीच दिला जातो. आजचा भूकंप 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता, त्यामुळे आज झालेल्या दिल्लीतील भूकंपाचा अलर्ट Gpoogle वर जारी केला गेला नाही.
गूगलचे अलर्ट सर्वच भूकंपासाठी मिळतील असे नाही.
हे अलर्ट प्रत्येक भागात लागू होतीलच असे नाही.
कधी हे अलर्ट भूकंपाच्या आधी, दरम्यान किंवा नंतर मिळू शकतात.
भूकंप ओळखण्यासाठी फोनमधील सेन्सर्सचा उपयोग होतो, त्यामुळे अचूकता ठराविक अटींवर अवलंबून असते.
आपल्या सुरक्षेसाठी अँड्रॉइड फोनमधील Earthquake Alert फीचर नक्की ऑन करून ठेवा.
त्यासाठी: फोनच्या Settings मध्ये जा
Safety & Emergency / Safety & Privacy या विभागात जा
Earthquake Alerts ऑप्शन ऑन करा
यामुळे आपत्कालीन प्रसंगी सूचना वेळेवर मिळू शकतात. मात्र, फक्त या फीचरवर अवलंबून राहणे योग्य नाही. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार कार्य करणे हेच अधिक सुरक्षित ठरेल.