WhatsApp Update: WhatsApp युजर्सना मोठा धक्का! अनेक अकाउंट अचानक 'Under Review'मध्ये; 24 तासांसाठी सेवा बंद

Whatsapp Account Under Review Issue: भारतासह अनेक देशांतील WhatsApp युजर्सची खाती अचानक 24 तासांसाठी 'Under Review' मध्ये गेल्याची घटना समोर आली आहे.
WhatsApp
WhatsApp Pudhari
Published on
Updated on

Whatsapp Account Under Review Issue: लोकप्रिय मेसेजिंग अॅप WhatsApp वापरणाऱ्या अनेक युजर्सना सोमवारी रात्री अचानक तांत्रिक अडथळा आला. भारतासह विविध देशांतील अनेक युजर्सची WhatsApp खाती 24 तासांसाठी 'Under Review' (पडताळणीअंतर्गत) ठेवण्यात आली. यामुळे संबंधित युजर्सना WhatsApp वरील जवळपास सर्व सुविधा वापरता आल्या नाहीत. या घटनेनंतर अनेक युजर्सनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली. कोणतीही पूर्वसूचना न देता खाते बंद करण्यात आल्याचा दावा युजर्सनी केला.

अचानक 'Under Review'चा मेसेज

सोमवारी रात्री सुमारे 8 वाजल्यापासून अनेक युजर्सच्या WhatsApp खात्यावर "Your account is under review" असा मेसेज दिसू लागला. त्यानंतर मेसेज पाठवणे, कॉल करणे किंवा इतर फीचर्स वापरता येत नव्हते. यामुळे अनेक युजर्समध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

WhatsApp ने काय प्रतिक्रिया दिली?

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना WhatsApp च्या प्रवक्त्यांनी सांगितले की, कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखण्यासाठी सातत्याने काम करत असते आणि संशयास्पद खात्यांवर कारवाई केली जाते.

मात्र, काही वेळा चुकूनही काही खाती पुनरावलोकनासाठी (Review) ठेवली जाऊ शकतात. अशा वेळी कंपनी शक्य तितक्या लवकर समस्या सोडवून संबंधित युजर्सचे खाते पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करते.

WhatsApp
Spider Man Box Office: 'स्पायडर-मॅन'चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 'पठाण', 'टायगर' आणि 'धुरंधर'लाही टाकलं मागे, किती कोटी कमावले?

24 तासांनंतर खाते पुन्हा सुरू होण्याची शक्यता

सध्या काही युजर्सच्या खात्यांचे पुनरावलोकन सुरू असून, अनेकांचे 24 तासांनंतर खाते पुन्हा सुरू होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. मात्र, WhatsApp कडून या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

WhatsApp
Live-In Relationships : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! ‘लिव्ह इन’ नात्यातील महिलांनाही मिळणार कलम ४९८ ए अंतर्गत संरक्षण

युजर्सनी काय करावं?

तज्ज्ञांच्या मते, जर तुमचे WhatsApp खातेही Under Review मध्ये गेले असेल, तर घाबरण्याची गरज नाही. कोणतेही अनधिकृत अॅप वापरणे टाळावे, WhatsApp चे अधिकृत अॅपच वापरावे आणि पुनरावलोकन पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी. सध्या या तांत्रिक अडचणीचे मूळ कारण शोधण्याचे काम सुरू असून, WhatsApp लवकरच याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news