Spam call blocking mobile settings: अनोळखी कॉल्सचा सततचा त्रास?स्मार्टफोनमधील 'हे' एक फीचर देईल कायमची सुटका

smartphone call block setting: अशा कॉल्समुळे केवळ चीडचीड होत नाही, तर अनेकदा आपला महत्त्वाचा वेळही वाया जातो. काही वेळेस तर या कॉल्सच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या घटनाही समोर आल्या आहेत
Spam call blocking mobile settings
Spam call blocking mobile settingsFile Photo
Published on
Updated on

महत्त्वाच्या कामात असताना किंवा कुटुंबासोबत वेळ घालवताना अचानक फोन वाजतो. आपण घाईघाईत फोन उचलतो आणि समोरून कोणीतरी क्रेडिट कार्ड, कर्ज किंवा एखादे उत्पादन विकण्याचा प्रयत्न करत असते. हा अनुभव जवळपास प्रत्येक स्मार्टफोन युजर्सला येतो.

या अनावश्यक कॉल्समुळे केवळ चीडचीड होत नाही, तर अनेकदा आपला महत्त्वाचा वेळही वाया जातो. काही वेळेस तर या कॉल्सच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या घटनाही समोर आल्या आहेत. पण या डोकेदुखीवर एक सोपा उपाय तुमच्याच फोनमध्ये लपलेला आहे, जो तुम्हाला या त्रासातून मुक्त करू शकतो.

Spam call blocking mobile settings
'Spam Calls'चा खेळ खल्लास ! सरकारने आणले 'हे' नवीन डिजीटल शस्त्र
Summary

ठळक मुद्दे:

  • स्मार्टफोन वापरकर्ते दररोज येणाऱ्या स्पॅम आणि प्रमोशनल कॉल्समुळे त्रस्त आहेत.

  • या कॉल्समुळे केवळ कामात व्यत्यय येत नाही, तर आर्थिक फसवणुकीचा धोकाही वाढतो.

  • तुमच्याच अँड्रॉइड फोनमध्ये एक सोपी सेटिंग आहे, जी या त्रासातून तुमची सुटका करू शकते.

स्पॅम कॉल्स म्हणजे काय आणि ते धोकादायक का आहेत? स्पॅम कॉल्स म्हणजे अशा कंपन्या किंवा व्यक्तींकडून आलेले कॉल्स, ज्यांच्याशी तुमचा कोणताही संबंध नसतो. त्यांचा मुख्य उद्देश जाहिरात करणे, उत्पादने विकणे किंवा काहीवेळा तुमची वैयक्तिक माहिती मिळवून फसवणूक करणे हा असतो. एक नंबर ब्लॉक केला तरी दुसऱ्या नवीन नंबरवरून कॉल येतो, त्यामुळे यावर नियंत्रण मिळवणे कठीण वाटते. मात्र, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमने युजर्ससाठी एक प्रभावी उपाय दिला आहे.

Spam call blocking mobile settings
Spam calls/Messege : मोबाईलवर येणाऱ्या स्पॅम कॉल-मेसेजपासून होणार सुटका; आजपासून नवीन नियम लागू

स्पॅम कॉल्सना करा कायमचा रामराम...

Spam कॉल (Call) किंवा मेसेजसाठी (Messege) आता कोणतेही वेगळे ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही. तुमच्या फोनमधील या सोप्या सेटिंग्ज वापरून तुम्ही अनावश्यक कॉल्सच्या त्रासातून कायमची सुटका मिळवू शकता. यामुळे तुमचा वेळ वाचेल, मानसिक त्रास कमी होईल आणि संभाव्य ऑनलाइन फसवणुकीपासूनही तुमचे संरक्षण होईल. त्यामुळे आजच तुमच्या फोनमधील ही सेटिंग तपासा आणि स्पॅम कॉल्सना कायमचा रामराम करा.

तुमच्या फोननुसार स्पॅम कॉल्स कसे ब्लॉक कराल?

वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये ही सेटिंग थोड्याफार फरकाने उपलब्ध असते. तुमच्याकडे असलेल्या फोननुसार खालील पद्धती वापरून तुम्ही स्पॅम कॉल्स कायमचे ब्लॉक करू शकता.

Spam call blocking mobile settings
स्पॅम कॉल्स आणि संदेशांच्या संख्येमध्ये मोठी घट, केंद्र सरकारचा दावा

१. OnePlus, Realme, Oppo, Vivo, iQOO या स्मार्टफोन्समध्ये Spam Call ब्लॉकची सुविधा

  • आजकाल बहुतांश अँड्रॉइड फोन्समध्ये गुगलचे डीफॉल्ट 'फोन ॲप' (डायलर) असते.

    त्यात स्पॅम कॉल्स रोखण्याची सुविधा दिलेली आहे.

  • तुमच्या फोनमधील Phone ॲप उघडा.

  • वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्स (⋮) वर क्लिक करा.

  • आता Settings (सेटिंग्ज) पर्यायावर जा.

  • येथे Caller ID & Spam (कॉलर आयडी आणि स्पॅम) हा पर्याय निवडा.

  • त्यानंतर "Filter spam calls" या पर्यायासमोरील बटण चालू (On) करा.

२. सॅमसंग (Samsung) स्मार्टफोन्ससाठी

  • सॅमसंगच्या फोन्समध्ये त्यांचे स्वतःचे डायलर ॲप असते, ज्यात ही सुविधा सहज उपलब्ध आहे.

  • Phone ॲप उघडा आणि तीन डॉट्स (⋮) वर क्लिक करून Settings मध्ये जा.

  • Block numbers (नंबर्स ब्लॉक करा) हा पर्याय निवडा.

  • येथे "Block spam and scam calls" हा पर्याय चालू (On) करा.

  • तुम्ही इच्छित असल्यास, "Block calls from unknown numbers" हा पर्याय निवडून सर्व अनोळखी नंबर्सवरून येणारे कॉल्स देखील ब्लॉक करू शकता.

Spam call blocking mobile settings
स्पॅम कॉल्स, मेसेजेसची कटकट कशी बंद करायची?

३. शाओमी/पोको (Xiaomi/Poco) स्मार्टफोन्ससाठी (MIUI/HyperOS)

  • शाओमी आणि पोकोच्या फोन्समध्येही ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे.

  • Phone ॲप उघडा आणि सेटिंग्ज आयकॉनवर टॅप करा.

  • येथे Blocklist (ब्लॉकलिस्ट) पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.

  • Call Blocklist मध्ये जाऊन "Block calls from strangers" किंवा "Block calls from hidden numbers" सारखे पर्याय तुमच्या गरजेनुसार चालू करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news