'Spam Calls'चा खेळ खल्लास ! सरकारने आणले 'हे' नवीन डिजीटल शस्त्र

TRAI DND App | आता मोबाईलवरील स्पॅम कॉल्स आणि कंपन्यांच्या प्रमोशनल SMSमधून मिळणार मुक्ती
TRAI DND App
TRAI DND App File Photo
Published on
Updated on

TRAI DND APP On Scam calls and messages

भारतीय मोबाईल युजर्सं सतत येणारे स्पॅम कॉल्स आणि विविध खाजगी कंपन्याचे येणाऱ्या SMSमुळे हैराण झालेत. परंतु, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) युजर्सच्या समस्येवर महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्राधिकरणाने युजर्सची या समस्यांपासून सुटका करण्यासाठी एक नवीन अ‍ॅप सादर केले आहे.

तुम्हालाही असे अ‍ॅप हवे असेल ज्याच्या मदतीने तुम्ही सर्व स्पॅम कॉल्स, टेलिमार्केटिंग कॉल्स आणि प्रमोशनल एसएमएसपासून मुक्त होऊ शकता, तर TRAI तुमच्या मदतीसाठी एक अतिशय उपयुक्त अ‍ॅप घेऊन आले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने TRAI DND (डू नॉट डिस्टर्ब) नावाचे एक अ‍ॅप सादर केले आहे, जे मोबाईल युजर्संना स्पॅम आणि टेलिमार्केटिंग कॉल्स व्यवस्थापित करण्यास मदत करते. केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) X वरील त्यांच्या पोस्टमध्ये याची पुष्टी केली आहे.

हेही वाचा :

TRAI DND App
‘ट्राय’शी संबंधित तरतुदी दूरसंचार धोरणातून वगळल्या जाणार

TRAI DND 3.0 अ‍ॅपचे PIBने केले Fact Check

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) जागरूकता मोहिमेचा भाग म्हणून या अ‍ॅपबद्दल माहिती देणारा संदेश लोकांपर्यंत पोहोचत होता. यावर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) सत्य पडताळणी (Fact check) केले. त्यानंतर पीआयबीने TRAI DND (ट्राय डीएनडी) हे एक वैध अ२प असल्याचे म्हटले आहे. PIB ने ही माहिती त्यांच्या एक्स पोस्टवरून दिली आहे. स्पॅम कॉल्स आणि प्रमोशनल एसएमएसपासून मुक्ती मिळवण्यासाठी 'TRAI DND 3.0' हे अ‍ॅप लॉन्च केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाईल युजर्स त्यांच्या मोबाइल नंबरवर येणाऱ्या अवांछित व्यावसायिक संप्रेषणांपासून (Unsolicited Commercial Communication - UCC) संरक्षण मिळवू शकतात.

TRAI DND अ‍ॅप असे डाउनलोड करा

  • TRAI DND 3.0 अ‍ॅप Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

  • Android युजर्ससाठी: Google Play Store वरून डाउनलोड करा.

  • iOS युजर्ससाठी: Apple App Store वरून डाउनलोड करा.

हेही वाचा :

TRAI DND App
देशाने 5G-6G तंत्रज्ञानाकडे वेगाने पाऊले उचलली : नरेंद्र मोदी

अ‍ॅप सेटअप आणि वापर

अ‍ॅप इन्स्टॉल करा: आपल्या स्मार्टफोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल करा.

आवश्यक परवानग्या द्या: अ‍ॅपला कॉल लॉग आणि एसएमएस ऍक्सेस करण्यासाठी आवश्यक परवानग्या द्या. हे अ‍ॅप आपले संपर्कसूची कोणत्याही प्रकारे शेअर करत नाही.

Google Play लॉगिन करा: आपल्या मोबाइल नंबरचा वापर करून अ‍ॅपमध्ये लॉगिन करा.

DND नोंदणी स्थिती तपासा: अ‍ॅपमध्ये "Registration Status" पर्यायावर क्लिक करून आपल्या नंबरवर DND सेवा सक्रिय आहे की नाही हे तपासा. आपल्या पसंतीनुसार DND सेवा सक्रिय किंवा निष्क्रिय करू शकता.

स्पॅम कॉल्स / एसएमएस रिपोर्ट करा: आपल्याला मिळालेल्या स्पॅम कॉल्स किंवा एसएमएस अ‍ॅपच्या माध्यमातून रिपोर्ट करा. अ‍ॅप आपोआप तक्रार नोंदणीसाठी आवश्यक माहिती तयार करेल.

अशी करा स्पॅम कॉल्सची तक्रार

जर तुम्हाला कधी स्पॅम कॉल्स आले असतील किंवा सातत्याने येत असतील, तर तुम्ही काही स्टेप्समध्ये या अ‍ॅपद्वारे 'त्या' नंबरची तक्रार करू शकाल. यासाठी तुम्हाला अ‍ॅपच्या होम स्क्रीनवरील स्पॅम कॉलवर टॅप करावे लागेल. यानंतर अ‍ॅप तुम्हाला तुमचे गेल्या ७ दिवसांचे कॉल रेकॉर्ड दाखवेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ७ दिवसांपेक्षा जुने कॉल रेकॉर्ड देखील पाहू शकता. यानंतर तुम्हाला ज्या नंबरवरून स्पॅम कॉल आला त्या नंबरवर टॅप करावे लागेल. यानंतर तुम्हाला ज्या श्रेणीत कॉल आला आहे ती निवडावी लागेल. तसेच, तुम्ही तुमची तक्रार क्रमांकाची माहिती १४५ अक्षरांमध्ये लिहून सबमिट करू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news