Sarvam AI | स्टार्टअप 'सर्वम' बनवणार भारताचं पहिलं स्वदेशी AI मॉडेल

चीनच्या डीपसीक (DeepSeek) बरोबर करणार स्पर्धा
Sarvam AI
स्टार्टअप 'सर्वम' बनवणार भारताचं पहिलं स्वदेशी AI मॉडेल File Photo
Published on
Updated on

sarvam startup developing indias first ai model

बंगळुरू: भारत सरकारने देशातील पहिले स्वदेशी AI (Artificial intelligence) लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) मॉडेल विकसित करण्यासाठी बंगळुरू स्थित स्टर्टअप आधारित 'सर्वम'ची निवड केली आहे. चीनचे स्वस्त मॉडेल डीपसीकची (DeepSeek) वाढती लोकप्रियता पाहता भारताने हे पाऊल उचलले आहे.

देशातील पहिले स्वदेशी AI (Artificial intelligence) तयार करण्यासाठी आलेल्या ६७ अर्जांमधून केंद्र सरकारने 'सर्वम' ची निवड केली आहे. स्वदेशी AI चे मॉडेल बनवण्यासाठी सरकारकडून 'सर्वम'ला संगणकीय संसाधनांच्या स्वरूपात मदत मिळणार आहे.

Sarvam AI
जगात पहिल्यांदाच असे घडणार! AI लिहिणार नवीन कायदे, UAE चे धाडसी पाऊल

'सर्वम' ही भारताच्या महत्त्वकांक्षी १० हजार ३७० कोटी रुपयांच्या 'इंडिया एआय' (India AI) मिशन अंतर्गत अधिकृतपणे मान्यता मिळालेली पहिली स्टार्टअप कंपनी आहे. सरकार सध्या इतर अन्य शेकडो प्रस्तावांचे देखील मूल्यांकन करत आहे. यावर 'सर्वम'ने त्यांचे एआय (AI) मॉडेल तार्किक क्षमतांनी सुसज्ज असेल. आवाज केंद्रीत असेल आणि भारतीय भाषांमध्ये प्रवीणता विकसित करेल. हे एआय मॉडेल लोकसंख्या-स्तरीय वापरासाठी विकसित केले जाईल, असेही म्हटले आहे.

Sarvam AI
India Adipoli AI server | भारताचे AI क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल; पहिल्या स्वदेशी एआय सर्व्हरचे अनावरण

सरकारकडून कशी मदत मिळणार

वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, सरकार 'सर्वम' स्टर्टअपला सहा महिन्यांसाठी ४ हजार ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स (GPUs) देईल जेणेकरून ते त्यांचे मॉडेल विकसित करू शकेल आणि त्यांना प्रशिक्षण देऊ शकेल. भारतात एआय डेटा सेंटर्स स्थापन करण्यासाठी निवडलेल्या कंपन्यांद्वारे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स (GPUs) उपलब्ध करून दिले जातील.

Sarvam AI
AI वकिलामुळे न्यायालयात गोंधळ! काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

पहिल्या स्वदेशी AI मॉडेलची वैशिष्ट्ये

भारताचे पहिले स्वदेशी AI मॉडेल ७० अब्ज पॅरामीटर्ससह तयार केले जाईल. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, या मॉडेलमध्ये प्रोग्रामिंग आणि अभियांत्रिकी क्षेत्रासंबंधी अनेक नवोपक्रम असतील. ज्यामुळे ते जगातील सर्वोत्तम मॉडेल्सना टक्कर देऊ शकेल. हे मॉडेल विशेषतः भारतीय भाषांसाठी सुधारित केले जाईल आणि ते ओपन-सोर्स केले जाणार नाही, असेही अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news