AI वकिलामुळे न्यायालयात गोंधळ! काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

AI Lawyer: न्यायमूर्ती संतप्त; आरोपीला द्यावा लागला खुलासा
AI Lawyer
AI Lawyerpudhari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: अलीकडच्या काळात जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर केला जात आहे. नुकतेच न्यायालयात एका संशयित आरोपीने स्वतःची बाजू मांडण्यासाठी चक्क AI वकिल उभा केला.

या AI वकिलामुळे कोर्टात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. न्यायमूर्तीही संतप्त झाले. काही काळ वातावरण तणावापूर्ण बनले. अगदी आरोपीला खुलासाही द्यावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. न्यू यॉर्क टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. (US Judge Halts Hearing After Man Uses AI Lawyer)

कोर्टात काय घडले?

न्यूयॉर्कमधील एका न्यायालयात हा प्रकार घडला आहे. 74 वर्षीय जेरोम डिवाल्ड यांनी त्यांच्या विरोधात गेलेल्या निर्णयाविरोधात न्यायालयात अपिल केले होते. त्यांनी वकिल न देता स्वतःच खटला लढविण्याचा निर्णय घेतला. स्वतःचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांनी चक्क AI वकिल उभा केला.

त्यांच्या युक्तिवादाला समर्थन देण्यासाठी त्यांनी एक पूर्वीच रेकॉर्ड केलेला व्हिडिओ न्यायालयात सादर केला. AI वकिलाच्या माध्यमातून जेव्हा जेरोम यांनी आपली बाजू मांडली तेव्हा न्यायमूर्तींचे पॅनल गोंधळात पडले.

न्यायमूर्ती संतप्त

त्यावर न्यायमूर्ती सॅली मॅन्झानेट-डॅनियल्स म्हणाल्या, "अपिल करणाऱ्याने युक्तिवादासाठी व्हिडिओ सादर केला आहे. ठीक आहे. आपण तो व्हिडिओ ऐकूया.

जेव्हा व्हिडिओ सुरू झाला, तेव्हा त्यात एका निळ्या कॉलरचा शर्ट आणि बेज स्वेटरमध्ये असलेला डिवाल्ड यांच्यापेक्षा तरुण दिसणारा पुरुष दिसून आला. न्यायमूर्ती काही क्षणांसाठी गोंधळले आणि त्यांनी विचारले की, "हा व्यक्ती तुमचा वकील आहे का?"

डिवाल्ड यांनी सांगितले की, हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने तयार केलेला डिजिटल अवतार आहे. तो खरा माणूस नाही, मीच तो AI अवतार तयार केला आहे.

त्यांचे उत्तर ऐकून न्यायमूर्ती मॅन्झानेट-डॅनियल्स संतप्त झाल्या आणि त्यांनी तो व्हिडिओ बंद करण्यास सांगितले. "तुम्ही अर्ज करताना हे सांगितलं असतं, तर बरं झालं असतं. मला फसवलं जाणं बिलकुल पसंत नाही," अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

डिवाल्ड यांचा माफीनामा

त्यानंतर डिवाल्ड यांनी न्यायालयाला पत्र लिहून माफी मागितली. माफीनाम्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझा हेतू कुणाची फसवणूक करण्याचा नव्हता, तर माझी बाजू शक्य तितक्या प्रभावीपणे मांडण्याचा होता. कुणालाही त्रास द्यायचा नव्हता.

मला वकील मिळाला नव्हता, त्यामुळे स्वतःलाच कायदेशीर युक्तिवाद मांडावा लागला. मी बोलतो तेव्हा बऱ्याचदा अस्पष्ट बोलतो, बोलताना शब्द चुकतात किंवा मी गोंधळून जातो. म्हणून एआयचा वापर केला.

मी स्वतःचा डिजिटल अवतार तयार करू इच्छित होतो, पण त्यात तांत्रिक अडचणी आल्या. योग्य माहिती देणे आणि पारदर्शकता राखणे हे सर्वात महत्त्वाचे आहे, हे मला मान्य आहे."

यापुर्वीही काेर्टात झाला AI चा वापर, पण...

यापुर्वी जून 2023 मध्ये दोन वकिलांनी ChatGPT या AI टूलचा वापर करून खटल्याकरिता कायदेशीर संशोधन केले होते. मात्र, AI ने त्यांना बनावट कायदेशीर प्रकरणे दिली. परिणामी, न्यूयॉर्कमधील एका फेडरल न्यायाधीशाने त्या दोन्ही वकिलांना आणि त्यांच्या फर्मला प्रत्येकी 5000 डॉलर दंड ठोठावला होता.

AI Lawyer
टॅरिफ टाळण्यासाठी भारतातून 600 टन आयफोन अमेरिकेत केले एअरलिफ्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news