ChatGPT ला विचारलेल्या एक सहज प्रश्नाने वाचवला गर्भवती आणि बाळाचा जीव...

ChatGPT saved Pregnant Woman's life: डॉक्टर म्हणाले तो दिवस तिचा अखेरचा ठरला असता
ChatGPT saved Pregnant Woman's life
ChatGPT saved Pregnant Woman's lifePudhari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आता आपल्या जीवनाचा भाग होत चालले आहे. OpenAi ने विकसित केलेला चॅटबॉट ChatGPT तर विविध क्षेत्रात उपयोगी ठरत आहे. आता तर ChatGPT ला काहीही प्रश्न विचारायच्या सवयीमुळे एका गर्भवतीचा जीव वाचल्याचे समोर आले आहे.

सहज म्हणून तिने विचारलेल्या प्रश्नावर ChatGPT ने जे उत्तर दिले त्यामुळे तिच्यासह तिच्या गर्भातील बाळाचा जीव वाचला. काय आहे नेमका प्रकार जाणून घेऊया... (ChatGPT saved Pregnant Woman's life)

नेमके काय घडले?

नतालिया टारियन या कंटेट क्रिएटरबाबत ही घटना घडली आहे. तिची याबाबतची पोस्ट इन्स्टाग्रामवर व्हायरल झाली आहे. मजा म्हणून तिने ChatGPT ला एक प्रश्न विचारला होता.

आणि त्यावर ChatGPT ने जे प्रत्युत्तर दिले ते तिला आणि तिच्या गर्भातील बाळाला जीवदान देऊन गेले. ChatGPT चा सल्ला तिला किती उपयोगी पडला याबद्दल तिने आभारच मानले आहेत.

इंस्टाग्राम पोस्टमध्ये नतालियाने म्हटले आहे की, “मी ChatGPT ला अगदी सहज आणि मजेत म्हणून विचारलं होतं की, ‘माझ्या जबड्याला ताण का जाणवतोय?’

त्यावर ChatGPT ने उत्तर दिले की, ‘तुमचा रक्तदाब तपासा.’ त्यावर मी रक्तदाब तपासला आणि मला धक्काच बसला. कारण रक्तदाब खूपच जास्त होता.

त्या दिवशी दवाखान्यात गेली नसती तर...

त्या वेळी नतालिया 8 महिन्यांची गर्भवती होती. त्यावर ChatGPT नेच तिला तत्काळ ॲम्ब्युलन्स बोलावण्यास सांगितले. ChatGPT च्या सूचनेनुसार तिने अॅम्ब्युलन्स बोलावली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर तिचा रक्तदाब धोकादायक 200/146 पातळीवर पोहचला होता.

नतालिया म्हणते, मी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी रक्तदाब तपासून सांगितले की, ‘तातडीने डिलिव्हरी करावी लागेल. बाळाला जन्माला घालावे लागेल. त्यानंतर माझा मुलगा सुरक्षितपणे जन्माला आला आणि मीही आता पूर्णपणे ठीक आहे.”

त्या दिवशी डॉक्टर नतालियाला म्हणाले की, जर ती दवाखान्यात आली नसती आणि तशीच झोपी गेली असती तर कदाचित ती दुसऱ्या दिवशीच्या सकाळी उठली नसती. ती रात्र तिच्यासाठी अखेरची ठरली असती.

नतालियाने ChatGPT बाबत व्यक्त केली कृतज्ञता

ChatGPT बाबत कृतज्ञता व्यक्त करत टारियन म्हणाल्या की, "प्रसुतीनंतर पाच दिवस माझा रक्तदाब वाढतच होता. काही वेळासाठी माझी दृष्टीही गेली होती. त्याबद्दल विचार करताच अंगावर शहारे येतात.

हे सगळं एका लहान लक्षणापासून सुरु झालं होतं आणि एका सहज विचारलेल्या प्रश्नाने आमचे जीव वाचवले. धन्यवाद, ChatGPT. तुझं कौतुक आहे. तु दोन जीव वाचवलेस. तु आमचा तारणहार आहेस."

वैद्यकीय तपासणीसाठी AI चा वापर जपून करण्याची गरज

दरम्यान, अशीच एक घटना रेडिटवर देखील घडली. जिथे एका वापरकर्त्याने सांगितलं की चॅट जीपीटीने त्यांचा पाच वर्षांपासून चाललेला जबड्याचा त्रास 60 सेकंदात थांबवला.

दरम्यान, ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. अनेकांनी ChatGPT च्या अचूक सूचनेचे कौतुक केले असले, तरी काही जणांनी असा इशाराही दिला आहे की, अशा AI टूल्सचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याच्या ऐवजी करू नये. वैद्यकीय तपासणीचा पर्याय म्हणून एआयचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

ChatGPT saved Pregnant Woman's life
'मुल जन्माला घालायचं का?' X वर मेसेज करून मस्क यांची महिलांना थेट शुक्राणुंची ऑफर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news