iPhone Duo Screen: ३ लाखांचा iPhone Duo खरेदी केल्यानंतर स्क्रीनला तडे? लॉन्चनंतर काही दिवसांतच ग्राहकांच्या तक्रारी, पाहा व्हिडिओ

iPhone Duo Screen Crack: iPhone Duo ची विक्री सुरू झाल्यानंतर काही ग्राहकांनी स्क्रीनला तडे गेल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
iPhone Duo Screen Crack
iPhone Duo Screen CrackPudhari
Published on: 
Updated on: 

iPhone Duo Screen Crack: Apple च्या पहिल्या फोल्डेबल आयफोनची विक्री सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच त्याच्या स्क्रीनबाबत तक्रारी समोर आल्या आहेत. फोन काही वेळा उघडल्यानंतर आणि बंद केल्यानंतर स्क्रीनला तडे गेल्याचा दावा काही ग्राहकांनी केला आहे. तर काही जणांनी स्क्रीनवर हिरव्या आणि चमकदार रेषा दिसत असल्याची तक्रार केली आहे.

भारतात iPhone Duo ची सुरुवातीची किंमत तब्बल २,९९,९०० रुपये आहे. त्यामुळे एवढ्या महागड्या फोनच्या स्क्रीनबाबत सुरुवातीपासूनच तक्रारी येत असल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.

फोन २० वेळाही उघडला नव्हता, तरी स्क्रीनला तडे

iPhone Duo ची विक्री २३ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली. त्यानंतर काही ग्राहकांनी Reddit आणि इतर ऑनलाइन माध्यमांवर आपल्या फोनच्या स्क्रीनचे फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये फोन ज्या ठिकाणी दुमडला जातो, त्या मधल्या भागात तडे किंवा चमकदार रेषा दिसत असल्याचे सांगण्यात आले.

एका ग्राहकाने दावा केला की, फोन खरेदी केल्यानंतर अवघ्या सहा तासांत त्याच्या स्क्रीनमध्ये बिघाड झाला. त्याने फोन २० वेळांपेक्षाही कमी उघडला आणि बंद केला होता. फोन उघडताना त्याला तडा गेल्यासारखा आवाज आला आणि स्क्रीनवर तडे दिसू लागले.

या ग्राहकाला Apple Store मध्ये खराब फोनच्या बदल्यात दुसरा फोन देण्यात आला. इतर काही ग्राहकांनीही अशाच प्रकारच्या तक्रारी केल्या आहेत. काही फोनच्या स्क्रीनवर हिरव्या किंवा चमकदार रेषा दिसत आहेत, तर काहींच्या स्क्रीनच्या मधल्या भागाचे नुकसान झाले आहे.

iPhone Duo Screen Crack
Video: हॉटेलच्या खोलीत पाय ठेवताच कोसळली, अवघ्या ५ सेकंदांत झाला मृत्यू! ३ महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न, काय घडलं?

iFixit च्या तपासणीत धुळीबाबत महत्त्वाची बाब समोर

फोनची अंतर्गत रचना आणि दुरुस्ती यांचा अभ्यास करणाऱ्या iFixit या वेबसाइटने iPhone Duo उघडून त्यातील भागांची तपासणी केली. या तपासणीत फोनच्या आतमध्ये धुळीचे कण गेले आहेत असं सांगण्यात आलं.

फोन दुमडताना वेगवेगळे भाग हालचाल करतात. अशा वेळी या भागांमध्ये धूळ अडकली, तर फोन उघडताना किंवा बंद करताना अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्क्रीनवर अतिरिक्त दाब पडण्याची शक्यताही असते.

iPhone Duo Screen Crack
Anushka Sharma: अनुष्का शर्माच्या एका पोस्टने बदललं छोले-भटुरे विकणाऱ्या हॉटेलचं नशीब; 18 लाखांच कर्ज होतं आता थेट 2 कोटीं विक्री

iFixit च्या तपासणीनुसार, स्क्रीनला तडे जाण्यामागे अनेक कारणे असू शकतात. फोनमधील एखादा भाग योग्य प्रकारे काम न करणे, वारंवार फोन दुमडल्यामुळे एका विशिष्ट भागावर ताण वाढणे किंवा फोन तयार करताना झालेली चूक, अशी काही संभाव्य कारणे सांगण्यात आली आहेत.

फोनच्या मधल्या भागात स्क्रीनला आधार देणारे अनेक घटक एकमेकांच्या जवळ आहेत. फोन वारंवार उघडताना आणि बंद करताना या भागावर ताण येऊ शकतो. फोनमधील एखादा भाग व्यवस्थित काम करत नसेल, तर त्याचा परिणाम स्क्रीनवर होण्याची शक्यता आहे. मात्र, ही संभाव्य कारणे आहेत.

स्क्रीन बदलण्यासाठी मोजावे लागू शकतात दीड लाख

iPhone Duo च्या स्क्रीनबाबतच्या तक्रारींमध्ये सर्वाधिक चिंता वाढवणारी बाब म्हणजे दुरुस्तीचा संभाव्य खर्च. भारतात या फोनची सुरुवातीची किंमत २,९९,९०० रुपये आहे. उपलब्ध माहितीनुसार, वॉरंटी संपल्यानंतर फोनची आतील स्क्रीन बदलण्यासाठी सुमारे १,४९,९०० रुपये खर्च येऊ शकतो. म्हणजेच स्क्रीन बदलण्याचा खर्च फोनच्या किमतीच्या जवळपास निम्मा आहे.

मात्र, प्रत्येक ग्राहकाला स्क्रीन दुरुस्त करण्यासाठी एवढीच रक्कम द्यावी लागेल असे नाही. प्रत्यक्ष खर्च हा फोनची स्थिती आणि कंपनीच्या दुरुस्तीविषयक नियमांवर अवलंबून असेल.

iPhone Duo खरेदी करण्यापूर्वी काय लक्षात ठेवावे?

iPhone Duo च्या स्क्रीनबाबत समोर आलेल्या तक्रारींमुळे फोल्डेबल फोनच्या टिकाऊपणावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ग्राहकांनी फोन खरेदी करण्यापूर्वी कंपनीच्या वॉरंटीच्या अटी, स्क्रीन दुरुस्तीचा खर्च आणि अपघात नुकसानीसाठी उपलब्ध असलेले संरक्षण यांची माहिती घ्यावी. स्क्रीनमध्ये कोणताही बदल दिसल्यास अधिकृत सेवा केंद्राशी संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news