Cyber Fraud: Online Scam मध्ये चॅटबॉटचा वापर, बड्या सायबर टेक कंपनीच्या अहवालातून काय समोर आलं, सावध कसं रहावं?

AI scam report latest news update: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) दिवसेंदिवस अधिक प्रगत होतंय, तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सायबर गुन्हेगारीत देखील वाढ होत असल्याने सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे.
Cyber Fraud: Online Scam
Cyber Fraud: Online Scam
Published on
Updated on

सायबर सुरक्षेबद्दल माहिती देणाऱ्या Quick Heal या मोठ्या टेक कंपनीने एक धक्कादायक इशारा दिला आहे. त्यांच्या अहवालानुसार, AI चॅटबॉट्समुळे (Artificial Intelligence Chatbots) भारतात सायबर गुन्हेगारीचा धोका खूप वाढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Attachment
DOC
QH Press Note_Quick Heal Technologies Limited Exposes Alarming Rise in AI Chatbot Scams Across India (1).docx
Download

AI मुळे गुन्हेगारांचे स्वरूप बदलले

  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अधिकाधिक प्रगत होत असताना, सायबर गुन्हेगार आता या तंत्रज्ञानाचा गैरवापर करत आहेत. ते प्री-ट्रेन केलेल्या भाषिक मॉडेल्सचा (language models) वापर करून 'स्वयंचलित फसवणूक कारखाने' (automated fraud factories) तयार करत आहेत.

  • या फसवणूक कारखान्यांमुळे, एकाचवेळी हजारो लोकांना लक्ष्य करणे शक्य झाले आहे. हे गुन्हेगार बँका (Bank), डिलिव्हरी सेवा (Delivery service) आणि सरकारी संस्था (Government Institutions) यांसारख्या विश्वासार्ह ब्रँड्सची अगदी हुबेहूब नक्कल करत आहेत, ज्यामुळे सामान्य लोकांना फसवणूक ओळखणे कठीण झाले आहे.

  • Quick Healच्या 'सिक्राइट लॅब्स'च्या (Seqrite Labs) संशोधकांनी केलेल्या तपासणीत हे गंभीर मुद्दे समोर आले आहेत. त्यांच्या सुरक्षा प्रयोगशाळांना दर महिन्याला AI-ने तयार केलेली फसवणुकीची हजारो नवीन साधने सापडत आहेत. यामुळे AI चॅटबॉट घोटाळे २०२५ मधील सर्वात मोठे डिजिटल धोके बनले आहेत.

Cyber Fraud: Online Scam
Cyber Fraud: मंत्र्याच्या नातेवाईकाचा प्रताप! सायबर फ्रॉडचे 21 कोटी रुपये जमा केले गोसेवा ट्रस्टच्या बँक खात्यात

फसवणुकीचे नवीन आणि धोकादायक स्वरूप

  • पारंपरिक ऑनलाइन फसवणुकीच्या (Phishing) तुलनेत हे नवीन स्वयंचलित (automated) फसवणूक चॅटबॉट्स खूप धोकादायक आहेत.

  • हे बॉट्स पीडितांच्या प्रतिसादानुसार रिअल-टाईममध्ये (Real-time) संभाषण बदलू शकतात.

  • बनावट डिलिव्हरी शुल्क, कस्टम्स दंड किंवा टेक्निकल सपोर्ट अशा अनेक गोष्टींसाठी हे रोबोट्स सहजपणे वापरले जातात.

  • एकाच सर्व्हरवरून एकाच वेळी हजारो फसवणुकीचे संवाद नियंत्रित करण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे.

Cyber Fraud: Online Scam
Cyber Fraud Alert : बनावट कॉल-मॅसेजला चाप बसणार

Quick Heal च्या अहवालानुसार, संभाषण करणाऱ्या इंटरफेसवर लोक जो नैसर्गिक विश्वास ठेवतात, त्याचा फायदा घेणारे काही प्रमुख घोटाळे खालीलप्रमाणे आहेत:

  • बनावट ग्राहक समर्थन (Fake Customer Support): तुमचे खाते हॅक झाले आहे, असे भासवून हे चॅटबॉट्स तुमच्याशी बोलतात आणि तुम्ही बनावट बँकिंग वेबसाइटवर आहात असे वाटेपर्यंत तुमच्या खात्याची गोपनीय माहिती (उदा. युजरनेम, पासवर्ड) चोरतात.

  • रोमान्स घोटाळे (Romance Scams): AI भाषा मॉडेल्सचा वापर करून हे बॉट्स आता भावनिक संवाद साधतात. यात AI-ने तयार केलेले फोटोही वापरले जातात. शेवटी हे 'कर्ज' मागतात किंवा तुम्हाला बनावट क्रिप्टो एक्सचेंजकडे वळवतात.

  • व्हॉईस असिस्टंट फसवणूक (Voice Assistant Frauds): व्हॉईस क्लोनिंग (Voice Cloning) तंत्रज्ञान वापरून कुटुंबातील सदस्यांच्या आवाजाची नक्कल केली जाते.

Cyber Fraud: Online Scam
Sambhajinagar ​​Fraud Case : विश्वास नांगरे पाटलांच्या नावाने पुन्हा सायबर फसवणूक

गुन्हेगार कसे काम करतात?

  • गुन्हेगार आता अत्यंत हुशारीने फसवणूक करत आहेत, ते dhl.com ऐवजी dhi-delivery.com सारखी मळलतीजुळती डोमेन नावे नोंदवतात.

  • मागील डेटा चोरीतून मिळालेल्या माहितीचा वापर करून, पीडितांना त्यांच्या नावाने अभिवादन करणारे स्क्रिप्टेड संवाद तयार करतात.

  • FraudGPT सारखी गुप्त AI साधने उत्तम फिशिंग किट्स तयार करतात आणि ते स्पॅम फिल्टर बायपास करणारे वैयक्तिकृत हल्ले (personalized attacks) करण्यासाठी टोन बदलतात.(उदा. बँकेसाठी औपचारिक, गेमिंगसाठी अनौपचारिक)

  • उदाहरणे: DHL-ब्रँडेड चॅटबॉट्स जे कस्टम्स शुल्काची मागणी करतात, 'मेटा सिक्युरिटी' असल्याची नक्कल करणारे व्हॉट्सअॅप बॉट्स जे पेज क्रेडेंशियल्स चोरतात.

Cyber Fraud: Online Scam
cyber crime: ऑनलाईन फसवणूक, सायबर चोरांकडून ९ लाखांचा गंडा

स्वतःचे संरक्षण कसे करावे?

तुम्ही फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा:

गोपनीय माहिती देऊ नका: कोणताही चॅटबॉट OTP, बँकिंग माहिती किंवा पासवर्ड मागत असल्यास त्वरित सावध व्हा. बँका, सरकारी संस्था किंवा कोणतेही अधिकृत प्लॅटफॉर्म चॅटमध्ये अशी माहिती कधीही मागत नाही.

संशयास्पद संकेत ओळखा: असामान्य व्याकरण किंवा स्पेलिंगच्या चुका (उदा. URL मध्ये).

घाई करायला लावणारी भाषा (urgent language) किंवा तातडीने पैसे भरण्यास सांगणे.

URL तपासा: चुकीचे स्पेलिंग असलेल्या डोमेन नावांसह संशयास्पद URLs कडे (वेबसाइटचा पत्ता) लक्षपूर्वक बघा. अधिकृत वेबसाइटचा पत्ता बरोबर आहे का, हे तपासा.

Quick Heal चे म्हणणे आहे की, जर तुम्हाला एक जरी 'लाल झेंडा' दिसला, तरी तुम्ही त्वरित संभाषण थांबवावे.

Cyber Fraud: Online Scam
Online fraud: फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना घरी जाऊन देणार प्रशिक्षण, नाशिक सायबर पोलिसांची पाच पथके तयार

Quick Healची अशी मदत घ्या

या वाढत्या धोक्यांपासून युजर्संना सुरक्षित ठेवण्यासाठी, Quick Heal ने AntiFraud.AI नावाचे भारतातील पहिले AI-शक्तीवर चालणारे फसवणूक प्रतिबंधक (fraud prevention) समाधान आणले आहे. ही प्रणाली प्रत्येक चॅट URL ला थेट तपासून धोकादायक डोमेन त्वरित ब्लॉक करते. फिशिंग शोधणे, अनधिकृत प्रवेशाचे निरीक्षण (suspicious microphone/camera activation) आणि फसवणूक अॅप शोधणे (fraud app detection) यांसारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये यात समाविष्ट आहेत.

Quick Healने जोर दिला आहे की, AI-ने तयार केलेली माहिती आता मानवी संवादापासून वेगळी ओळखणे कठीण होत आहे. त्यामुळे केवळ 'आपल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा' हा सल्ला पुरेसा नाही. या नवीन सायबर गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, पडताळणी पद्धती आणि सार्वजनिक शिक्षण आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news