Cyber Fraud Shiv Gaura Gau Seva Trust :
गोसेवा ट्रेस्टच्या नावावर उघडण्यात आलेल्या बँक अकाऊंटमध्ये सायबर फ्रॉडचे पैसे येत होते. त्यानंतर ते दुसऱ्या खात्यात जमा केले जात होते. या प्रकरणाचा सायबर क्राईम पोलिसांनी भांडाफोड केला आहे. एका महिन्यात जवळपास २१ कोटी रूपये लंपास केल्याचं उघड झालं असून या प्रकरणी दोन युवकांना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या एका तरूणाने दिलेल्या माहितीनुसार गोसेवा ट्रस्टच्या नावानं बँक अकाऊंट उघडण्यास या टोळीचा म्होरक्या अभिषेकने सांगितलं होतं. अभिषेक हा उत्तर प्रदेश ऊस विकास मंत्र्याच्या मुलाचा मेहुणा आहे. याबाबत उत्तर प्रदेशचे ऊस विकास आणि साखर कारखाना मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी मला याबाबत काही माहिती नाही असं सांगितलं आहे. जर एखादा नातेवाईक चुकीचं काहीतरी करत असेल तर यात आम्ही काय करू शकतो. पोलीस आपलं काम करतील असंही ते म्हणाले आहेत.
गेल्या ६ ऑगस्टला बँक ऑफ इंडियाच्या कँट शाखेत गौतम उपाध्याय, शिवम कुमार, गोविंद कुमार यांनी शिव गौरा गोसेवा स्ट्रस्टच्या नावानं एक करंट अकाऊंट उघडलं होतं. या खात्यात एका महिन्यात २१ कोटी रूपायांची देवाण घेवाण जाली. यानंतर बँक मॅनेजरनं याबाबत सायबर पोलिसांना सूचना दिल्या.
या खात्यातून २०.९३ कोटी रूपये दुसऱ्या बँक खात्यात पाठवण्यात आळे. त्यानंतर ही रक्कम काढण्यात आली, यावर सायबर टीमच्या पोर्टलवर ट्रस्टच्या खात्याच्या नावावर फ्रॉडच्या शेकडो तक्रारी मिळाल्या आहेत. त्यानंतर सायबर पोलिसांनी हे खातं गोठवलं असून त्यातील लाखो रूपये फ्रीज करण्यात आले आहेत.
देशभरातील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं झालेल्या सायबर फ्रॉडमधील रक्कम ही या गोसेवा ट्रस्टच्या नावानं उघडलेल्या खात्यात पाठवण्यात आली होती. आता पोलिसांकडून या बँक खात्याशी संबंधित असलेल्या लोकांचा तपास सुरू केला आहे.
शनिवारी रात्री १२ वाजता गौतम उपाध्याय आणि बलदेव सिंह यांना पोलिसांनी अटक केली. बलदेव सिंहनं सांगितलं की त्याच्या मावशीचा मुलगा अभिषेक उर्फ पीकेने ट्रस्टच्या नावावर खांत उघडण्यास सांगितल होतं. हा अभिषेक मथुराचा रहिवासी आहे. खातं उघडल्यानंतर पासबूक आणि एटीएमसह अन्य कागदपत्र ही अभिषेकने आपल्याकडे घेतली. तोच या खात्यात पैशाची देवाण-घेवाण करत होता.