

ChatGPT user trends report latest update news
ओपनएआयच्या (OpenAI) नवीन आर्थिक अहवालानुसार, ChatGPT चा वापर करणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा किंचित जास्त झाली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे व्यवस्थापन (Management), शिक्षण (Education), आरोग्य (Health) आणि संशोधन (Research) यांसारख्या क्षेत्रातील लोकांची उत्पादकता (Productivity) वाढली आहे.
डिसेंबर 2022 मध्ये सुरू झालेल्या ChatGPT चे आता 70 कोटींहून अधिक युजर्स आहेत. हार्वर्ड आणि ड्यूक युनिव्हर्सिटीसोबत केलेल्या OpenAIच्या संशोधननुसार, दर सेकंदाला सुमारे 29 हजार संदेश ChatGPTला पाठवले जात आहेत.
सामान्यतः असे मानले जाते की, तांत्रिक कामांमध्ये किंवा तंत्रज्ञानाच्या वापरात पुरुष पुढे असतात. मात्र, ओपनएआयच्या ताज्या अहवालाने हे चित्र बदलले आहे. या अहवालात सांगितले आहे की, आता ChatGPT वापरणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा थोडी पुढे गेली आहे. OpenAI युजर्संच्या नावांचे विश्लेषण करून लिंगाचा अंदाज लावते. जून महिन्याच्या आकडेवारीनुसार, महिला नावे असलेले युजर्स ChatGPT चा वापर अधिक करत आहेत. सुरुवातीला ChatGPT चे 80 टक्के युजर्स पुरुष होते, परंतु जुलै 2025 पर्यंत महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षाही वाढला आहे.
ChatGPT सारख्या AI चॅटबॉट्समुळे जगभरातील कामाच्या पद्धतीत मोठे बदल झाले आहेत. व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य आणि संशोधन यांसारखी ज्ञान-आधारित (Knowledge-based) कामे आता पूर्वीपेक्षा खूप सोपी आणि जलद झाली आहेत. अहवाल लिहिण्यापासून ते एखाद्या विषयावर मार्गदर्शन करण्यापर्यंत, AI साधनांनी उत्पादकतेत वाढ केली आहे.
पाठवल्या जाणाऱ्या संदेशांचा विचार केल्यास, जवळपास 40% युजर्स लेख लिहिणे किंवा ईमेल मसुदा तयार करणे (Drafting) यांसारख्या व्यावसायिक कामांसाठी याचा वापर करतात.
29 % चॅट्स सल्ला किंवा मार्गदर्शनासाठी येत असतात.
24% लोक आवश्यक माहितीच्या शोधात येतात.
तांत्रिक किंवा प्रोग्रामिंगशी संबंधित संदेश फक्त 4.2 % आहेत.
1.9 % युजर्स व्हॉइस चॅटमध्ये संबंध आणि भावनिक विषयांवर चर्चा करतात.
०.4 % लोक गेम किंवा रोल प्ले (Role Play) पसंत करतात.
ChatGPT सारख्या AI चॅटबॉट्सवर सर्वात जास्त सक्रिय युजर्स 18 ते 25 वयोगटातील तरुण आहेत, जे एकूण चॅटपैकी 46 % संदेश पाठवतात. विशेष म्हणजे, कमी उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ChatGPT ची लोकप्रियता खूप वेगाने वाढली आहे.