

OpenAI ChatGPT 5 latest AI update 2025
टेकन्यूज: ओपनएआयने (OpenAI) अखेर गुरूवारी रात्री त्यांचे सर्वात प्रगत आणि शक्तिशाली AI मॉडेल GPT-5 लाँन्च केले. आता GPT-5द्वारे युजर्संनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांप्रमाणे उत्तरे दिली जातील, असे ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी स्पष्ट केले आहे.
जीपीटी-५ (GPT-5) हे नवे व्हर्जन अचूकता, वेग, तर्क आणि गणितीय क्षमतांमध्ये प्रगत असेल. तसेच लाँचिंग दरम्यान OpenAI सीईओ सॅम ऑल्टमन यांनी भारताचाही उल्लेख केला. भारत जागतिक स्तरावर एआयची सर्वात मोठी बाजारपेठ बनू शकेल, असे त्यांनी यावेळी म्हटले.
मागील दोन वर्षांपूर्वी OpenAIने GPT4 लाँन्च केले होते. कंपनीच्या माहितीनुसार, GPT5 पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट, वेगवान आणि अधिक उपयुक्त असणार आहे. जीपीटी-५ लॉन्चिंगनंतर माध्यमांशी बोलताना सॅम ऑल्टमन म्हणाले, भारत ही वेगाने वाढत जाणारी मोठी बाजारपेठ आहे. भारतातील लोक आणि व्यवसाय वेगाने AI तंत्रज्ञान स्विकारत आहेत. अमेरिकेनंतर भारत ही आमची दुसरी सर्वात मोठी एआय बाजारपेठ असणार आहे.
१. कोडिंग आणि व्यावसायिक कामांसाठी अधिक सक्षम
ChatGPTचे लेटेस्ट GPT-5 व्हर्जन आता मोठे प्रोजेक्ट्स हाताळू शकते, अधिक संदर्भ लक्षात ठेवते आणि कामाच्या विविध टप्प्यांमध्ये मदत करते. वैज्ञानिक समस्यांवर आणि व्हिज्युअल रिझनिंगमध्येही ते अधिक प्रभावी आहे. आरोग्यविषयक संभाषणात GPT-5 डॉक्टरची जागा घेत नाही, पण उपयोगी प्रश्न विचारून, डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी तयारी करण्यात आणि स्थानिक माहिती देण्यात मदत करते.
२. नवीन लूक आणि व्हॉईस फीचर्स
आता ChatGPT मध्ये वैयक्तिकरण शक्य आहे. युजर्स इंटरफेसचे रंग बदलू शकतात आणि “Cynic”, “Listener” किंवा “Robot” यांसारख्या प्रीसेट पर्सनॅलिटीज निवडू शकतात. यामधील व्हॉईस मोड अधिक नैसर्गिक आणि नियंत्रित झाला आहे. पेड प्लॅन्ससाठी वापर मर्यादा वाढवण्यात आली आहे. यामधील जुन्या “Standard Voice” पर्यायाला लवकरच निरोप दिला जाणार आहे.
३. Google सेवांसह थेट इंटिग्रेशन
लवकरच Gmail, Google Calendar आणि Google Contacts थेट ChatGPT शी जोडता येणार आहेत. एकदा लिंक केल्यावर, ChatGPT या डेटाचा वापर संबंधित उत्तरांसाठी करू शकतो, प्रत्येक वेळी नव्याने सूचना देण्याची गरज नाही.
४. अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह
OpenAIच्या मते, GPT-5 चुकीची किंवा धोकादायक उत्तरे देण्याचा धोका कमी करते. नवीन “safe completion” प्रणालीमुळे, तो सुरक्षिततेच्या मर्यादेत राहून शक्य तितकी उपयुक्त उत्तरे देतो, तो कोणत्याहीप्रकारे नकार देत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
५. लेखकांसाठी अधिक उपयुक्त
GPT-5 आता टोन आणि स्ट्रक्चर अधिक सहज बदलू शकतो. 256K टोकन मेमरी विंडोमुळे, तो लांब संभाषणे आणि दस्तऐवज लक्षात ठेवू शकतो, त्यामुळे मोठ्या प्रोजेक्ट्सवर सातत्याने काम करता येते.
GPT-5 हे लेटेस्ट व्हर्जन सर्व ChatGPT युजर्संसाठी उपलब्ध आहे.
फ्री युजर्सना GPT-5 आणि GPT-5 मिनी मर्यादित वापरासाठी मिळतात, तर Plus आणि Pro सबस्क्रायबर्सना जास्त मर्यादा आणि Pro ला अनलिमिटेड अॅक्सेस मिळतो.
डेव्हलपर्ससाठी gpt-5, gpt-5-mini आणि gpt-5-nano हे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत, जे GPT-4o पेक्षा वेगवान आणि स्वस्त आहेत.
OpenAIच्या या नव्या पिढीच्या AI सह, ChatGPT आता विद्यार्थ्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वांसाठी अधिक उपयुक्त, सुरक्षित आणि कार्यक्षम ठरणार आहे.
ओपनएआयने नोव्हेंबर 2023 मध्ये त्याचे पहिले मॉडेल चॅटजीपीटी 3.5 लाँच केले. तेव्हापासून, ओपनएआय जगभरातील सर्वात मौल्यवान तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक बनली आहे. चॅटजीपीटी 5 हे आतापर्यंत बाजारात ओपनएआयने लाँच केलेल्या इतर मॉडेल्सपेक्षा खूपच अचूक असेल. त्यात ओ3 मॉडेलपेक्षा गोंधळ कमी असेल. जीपीटी 5 विचार देखील करू शकते परंतु ते खूप जलद काम करेल.