

जगाने डिजिटल युगात प्रवेश केलेला आपल्याला सर्वांनाच दिसून येत आहे. व्यवसाय, दळणवळण, प्रवास, आरोग्य, शिक्षण अशा मानवी जीवनाच्या विविध पैलूंना आज तंत्रज्ञानाने स्पर्श केला आहे. शिक्षण क्षेत्रावर तंत्रज्ञानाचा फार मोठा परिणाम होत असल्याचे दिसत आहे, यातून एज्युटेक किंवा EdTech हे नवे क्षेत्रच उदयाला आले आहे. वेगाने विकसित होत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरातून एज्युटेक या क्षेत्रात क्रांतिकारी आणि दूरगामी बदल होत आहेत. (AI in Education)
AIची मूलभूत संकल्पना मशीनने मानवाप्रमाणे निर्णय घ्यावा अशी आहे. यामध्ये AI संशोधक मशीन लर्निंग, नैसर्गिक भाषा प्रक्रिया, आणि कम्प्यूटेशनल व्हिज्युअलाइझेशन यांसारख्या तंत्रांचा वापर करतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या तंत्रज्ञानात शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे. AI विद्यार्थ्यांना अधिक वैयक्तिकृत शिक्षण देऊ शकते, शिकण्याची प्रक्रिया अधिक रंजक बनवू शकते आणि शिक्षकांच्या कामाचे स्वरूप बदलू शकते. तसेच अशैक्षणिक आणि प्रशासकीय कामाची भाग AI वर सोपवता आला तर, शिक्षक शिकवण्याचा कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील.
हे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा आणि क्षमतांनुसार शिक्षण देऊ शकते. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यास मदत ही होते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यास अधिक रस निर्माण होतो. तसेच AI शिक्षकांना नवनवीन प्रयोगांची संधी देईल.
AI विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील जटिल संकल्पना झटपट समजण्यास मदत करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
त्याचबरोबर AI शिक्षण क्षेत्रात अनेक आव्हानांना तोंड देत आहे. या आव्हानांमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होतो. त्यामध्ये शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना AI प्रणालीचा प्रभावीपणे वापर करता येण्यासाठी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. AI शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यास मदत करू शकते.
गोपनीयतेचा प्रश्न
जेव्हा विद्यार्थी किंवा शिक्षक जनरेटिव्ह-एआय साधनांशी संवाद साधतात, तेव्हा त्यांची संभाषणे आणि वैयक्तिक माहिती संग्रहित आणि विश्लेषित करून ठेवली जाऊ शकते. त्यामुळे त्यांच्या गोपनीयतेला देखील धोका निर्माण होतो.
शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही AI चा वापर लाभदायक ठरू शकते. अर्थात याही तंत्रज्ञानात काही धोके असणार आहेत. दोन्ही बाजू विचारात घेऊन शैक्षणिक क्षेत्रात AIचा वापर कसा करावा, आणि शिक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकांना नव्या तंत्रज्ञानाचा लाभ कसा पोहोचेल यावर सरकारी पातळीवर धोरण निश्चित करण्याची गरज आहे.
हेही वाचा