शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील | पुढारी

शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय शिक्षण धोरणाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, जून 2024 मध्ये सर्व महाविद्यालयांनी या धोरणानुसार अभ्यासक्रम राबविणे बंधनकारक आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. भारतीय शिक्षण संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जे. पी. नाईक शिक्षण आणि विकास केंद्र कोथरूड येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते. ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण – 2020 अंतर्गत उच्च शिक्षणातील सर्व घटकांच्या भूमिका व जबाबदार्‍या’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रीय शिक्षण धोरणच्या महाराष्ट्र राज्य सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रा. नितीन करमळकर, भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण अडसूळ, शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. एम. एस. देशमुख, सोलापूर विद्यापीठाच्या कॉमर्स मॅनेजमेंटचे अधिष्ठाता प्रा. शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ’राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अंमलबजावणीला गेल्या सव्वा वर्षाच्या कालावधीत राज्य शासनाने गती दिली असून, अंमलबजावणीत देशामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. 1 हजार 500 पदव्युत्तर शिक्षण संस्था, विद्यापीठ, स्वायत्त उच्च शिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button