TCS appraisal band d : TCS ने कर्मचाऱ्यांना 'कोटा' सिस्टमनं टाकलं lowest performance श्रेणीत; मॅनेजर्सना होतं टार्गेट

TCS appraisal band d
TCS appraisal band dpudhari
Published on
Updated on

TCS appraisal band d quota system 2026: TCS अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या देशातील एक मोठ्या आयटी कंपनीने नुकतेच मोठी नोकरकपात केली. यावेळी टीसीएसने पगारवाढीच्या सायकलवेळी आपल्या मॅनेजर्सना जवळपास ५ टक्के कर्मचाऱ्यांना lowest performance श्रेणीत टाकण्यास सांगितलं होतं. याबाबतचे अंतर्गत मेल मिंटच्या हाती लागला आहे. त्यात अशा प्रकारची कारवाई झाल्याचे कन्फर्म झालं आहे.

TCS appraisal band d
IT Sector Crisis: AI आणि जागतिक मंदीमुळे हाहाकार; भारतीय आयटी क्षेत्राला मोठा फटका, नेमकं काय घडतयं?

टीसीएस ही देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर एक्सपोर्ट कंपनी आहे. या कंपनीने मोठ्या प्रमाणात नोकर कपात केली आहे. नुकतेच त्यांनी १२,२०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. या सर्व लोकांना lowest performance या बँडमध्ये ठेवलं होतं. याबाबतची माहिती ही प्रक्रियेशी संबंधित असलेल्या एक्झिक्युटिव्हने दिली आहे.

टीसीएसच्या एचआर एक्झिक्युटिव्हकडून बिजनेस युनिट हेडला एक ईमेल पाठवण्यात आला होता. त्यात, 'कृपा करून कडक रिव्ह्यू करून बौठकीत ठरल्याप्रमाणे ५ टक्के कोणत्या असोसिएट्सना बँड डी मध्ये टाकता येईल याची यादी द्या.'

TCS appraisal band d
Tech Layoffs: टेक क्षेत्रात मोठा भूकंप! मायक्रोसॉफ्ट आणि मेटाच्या प्लॅनमुळे 23,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार

अजून तीन एक्झिक्युटिव्हजनी दिलेल्या माहितीनुसार बिजनेस युनिट हेड्सनी जवळपास ३ टक्के कर्मचाऱ्यांना किंवा १७,५०० लोकांना अंडर परफॉर्मर्स श्रेणीत टाकले होते. टॉप परफॉर्मर लोकांना वार्षिक ६ टक्के पगारवाढ मिळाल्याचे पत्र रविवारी पाठवण्यात आले होते.

टीसीएस, इन्फोसिस आणि एचसीएल कंपन्यांसारख्या आयटी कंपन्या या काही कर्मचाऱ्यांना अंडर परफॉर्मर क्षेणीत टाकण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अनेक एक्झिक्युटिव्हच्या मते बँड डी मध्ये ५ टक्के लोकांना टाकण्याचे टार्गेट पूर्ण करण्यानं अपराईजल सायकलमध्ये मोठा बदल झाला आहे.

TCS appraisal band d
BBC Job Cuts: बीबीसी २००० नोकऱ्या कमी करणार... कारण वाढती महागाई, आर्थिक ताण अन् घटतं व्यावसायिक उत्पन्न

'गेल्या वर्षीच युनिटला कर्मचाऱ्यांना इतर आयटी कंपन्यांप्रमाणे बँड डी मध्ये टाकण्यात येऊ शकतं याची कल्पना आली होती.' अशी माहिती एका एक्झिक्युटिव्हनं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news