

BBC Job Cuts: जगातील प्रतिष्ठित न्यूज एजन्सी बीबीसीने आगामी काळात २००० नोकऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय वार्षिक बजेटमध्ये १० टक्क्यांनी घट करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचा भाग म्हणून घेण्यात येणार आहे. यामुळे आगामी दोन वर्षात जवळपास ६७७ मिलियन डॉलर्सची कपात होण्याची शक्यता आहे.
हा निर्णय स्टाफ कॉलदरम्यान सर्वांना सांगण्यात आला. यामुळं बीबीसी दशकातील आपले सर्वात मोठ्या नोकर कपातीची सुरूवात करत आहे. असोसिएट प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अंतरिम डायरेक्टर जनरल रोद्री टलफॅन डेव्हिस यांनी स्टाफला ईमेल करून सांगितलं की, 'यामुळं खरंच अनिश्चितता निर्माण होणार आहे मला याची जाणीव आहे. मात्र आम्हाला येणाऱ्या आव्हानाबाबत स्पष्टपणे बोलणं गरजेचं आहे.'
डेव्हिस पुढे म्हणाले, ही नोकर कपात वाढती महागाई, लायसन्स फीबाबत वाढता आर्थिक ताण, व्यावसायिक उत्पन्न आणि सध्या सुरू असलेली जागतिक आर्थिक अनिश्चितता या पार्श्वभूमीवर करण्यात येणार आहे.
'तुम्हाला माहिती आहेच की बीबीसी मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताण सहन करत आहे. याला आपण शांततेनं प्रतिक्रिया दिली पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपला खर्च आणि आपले उत्पन्न यातील तफावत वाढत आहे. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. प्रोडक्शन इन्फ्लेशन वाढलं आहे. त्याचबरोबर आपली लायसन्स फी आणि व्यावसायिक उत्पन्न याच्यावर ताण येत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता आहे.' डेव्हिस यांनी बीबीसीपुढे कोणती आव्हाने आहेत हे सर्वांसमोर ठेवलं.
या वर्षाच्या सुरूवातीलाच बीबीसीने संस्थेवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताण येत आहे असा इशारा दिला होता. त्यानंतर २०२९ पर्यंत त्यांचे बजेट जवळपास १० टक्क्यांनी कमी करण्याची ढोबळ योजना आखली होती. यातील सर्वात जास्त कॉस्ट कटिंग हे १ एप्रिल २०२७ पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे.
बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार डेव्हिस यांनी बीबीसी रेडिओ ४ मीडिया शोमध्ये सांगितंल की आपल्या संस्थेने सर्व पर्याय खूप काळजीपूर्वक मुल्यमापन केलं पाहिजे. ५०० पाऊंड मिलियन टार्गेट महत्वाचे आहे. काही मोठे आणि काही अत्यंत अवघड निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागणार आहेत.
ते पुढे म्हणाले, 'बीबीसीच्या रेडिओ, टीव्ही आणि ऑनलाईन सेवा बाधित न होता हे बदल पुढच्या तीन ते चार महिन्यात कसे करायचे हे महत्वाचे काम असणार आहे.'
माजी गुगल एक्झिक्युटिव्ह मॅट ब्रिट्टीन हे पुढच्या महिन्यात डायरेक्टर जनरल म्हणून पदभार स्विकारण्याची शक्यता आहे त्या प्रार्श्वभूमीवर बीबीसीचा हा बजेट कटचा निर्णय आला आहे.