Best Indian Ice Creams | भारतीय आईस्क्रीम्स जगात भारी..! १०० सर्वोत्तम ब्रँड्समध्ये 'के रुस्तम', 'नॅचरल्स'सह ५ भारतीय

टेस्टॲटलसकडून जगातील प्रतिष्ठित आईस्क्रीम्सची यादी जाहीर
Best Indian Ice Creams
'टेस्टॲटलस'ने नुकतेच 'जगातील १०० सर्वात प्रतिष्ठित आईस्क्रीम्सची' यादी जाहीर केली असून, यामध्‍ये भारताच्या ५ लोकप्रिय आईस्क्रीम्सनी स्थान मिळवले आहे.Pudhari
Published on
Updated on

Best Indian Ice Creams

कडक उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होत असताना, मनाला सुखावणारी थंडगार आईस्क्रीमची चव कोणाला आवडत नाही? आईस्क्रीम हे नाव उच्चारताच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच जिभेवर ती गोड चव रेंगाळू लागते. एकदा का तुम्‍हाला अद्वितीय चवीची सवय झाली, की आईस्क्रीम आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनून जातं. त्यामुळेच पिढ्यानपिढ्या काही ठराविक आईस्क्रीम ब्रँड्सनी घराघरांमध्ये आणि मनामनांमध्ये एक घट्ट नातं निर्माण केलं आहे. आता हे सगळं सांगण्याचं खास कारण म्हणजे जागतिक स्तरावर खाद्यसंस्कृती आणि पर्यटन क्षेत्राची माहिती देणाऱ्या प्रसिद्ध 'टेस्टॲटलस' (TasteAtlas) या गाईडने नुकतेच 'जगातील १०० सर्वात प्रतिष्ठित (Most Iconic) आईस्क्रीम्सची' यादी जाहीर केली आहे. या यादीत जगभरातील दिग्गज आईस्क्रीम्सचा समावेश असून, भारताच्या तब्बल ५ लोकप्रिय आईस्क्रीम्सनी यात मानाचे स्थान मिळवले आहे.

Best Indian Ice Creams

मुंबईतील 'के. रुस्तम'चे आईस्क्रीम सँडविच

सन १९५३ मध्ये सुरू झालेले मुंबईतील 'के. रुस्तम अँड कंपनी' हे दुकान त्यांच्या जुन्या धाटणीच्या 'आईस्क्रीम सँडविच'साठी जगप्रसिद्ध आहे. नेहमीच्या ब्रेडऐवजी कुरकुरीत वेफरच्या मध्ये आईस्क्रीम ठेवून दिले जाणारे हे सँडविच अत्यंत साधे पण तितकेच चविष्ट आहे. आजही इथले मँगो आणि चॉकलेट फ्लेवर्स खाण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागतात. गेल्या काही दशकांत हे ठिकाण मुंबईची एक वेगळी ओळख बनले आहे.

Best Indian Ice Creams
ice cream history | थंडावा देणार्‍या ‘आईस्क्रीम’चा हजारो वर्षांचा रंजक प्रवास
Best Indian Ice Creams

बंगळुरू कॉर्नर हाऊमधील डेथ बाय चॉकलेट

बंगळुरूच्या स्थानिक रहिवाशांसाठी 'कॉर्नर हाऊस' (Corner House) म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय आहे. या ब्रँडचे प्रसिद्ध 'डेथ बाय चॉकलेट' हे आईस्क्रीम या जागतिक यादीत समाविष्ट झाले आहे. चॉकलेट केकचे थर, व्हॅनिला आईस्क्रीम, घट्ट चॉकलेट सॉस, क्रीम आणि सुकामेवा (Nuts) यांनी समृद्ध असलेले हे डेझर्ट चॉकलेटप्रेमींसाठी पर्वणीच ठरते.

Best Indian Ice Creams
Nashik Ice Cream Prices 2026 इराण-इस्रायल युद्धाचा आइस्क्रीम उद्योगाला चटका; दरही १५ ते २० टक्क्यांनी वाढले
Best Indian Ice Creams

टेंडर कोकोनट आईस्क्रीम (नॅचरल्स - मुंबई)

अस्सल फळे आणि नैसर्गिक घटकांचा वापर करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या 'नॅचरल्स आईस्क्रीमने' (Naturals) आपल्या 'टेंडर कोकोनट' (शहाळ्याचे पाणी/मलाई) फ्लेवरमुळे जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेतले आहे. ओल्या नारळाचे (शहाळ्याचे) तुकडे असलेल्या या फ्लेवरला देशभरात मोठी मागणी आहे.

Best Indian Ice Creams
Creamy Lassi : साखर न वापरता कशी बनवायची मलाईदार लस्सी?

पेरू फ्लेवर (अप्सरा आईस्क्रीम - मुंबई)

मुंबईच्या 'अप्सरा आईस्क्रीम्सने' (Apsara Ice Creams) आपल्या अनोख्या पेरू (Guava) फ्लेवरसह या यादीत स्थान मिळवले आहे. भारतात रस्त्याकडेला मिळणाऱ्या तिखट-मीठ लावलेल्या पेरूच्या चवीवरून हा फ्लेवर तयार करण्यात आला आहे. गोड पेरूच्या आईस्क्रीमवर मारलेली मसाल्याची चव एकाच वेळी ताजेपणा आणि बालपणीच्या आठवणींची सफर घडवून आणते.

Best Indian Ice Creams
Navi Mumbai Bakeries: आखाती युद्धामुळे नवी मुंबईत बेकरी व्यवसाय दुहेरी संकटात

गडबड आईस्क्रीम (पब्बाज् - मंगळुरू)

कर्नाटकातील मंगळुरू शहराला भेट देणाऱ्या पर्यटकांची सफर तिथल्या 'पब्बाज्' (Pabba's) मधील प्रसिद्ध 'गडबड आईस्क्रीम' खाल्ल्याशिवाय अपूर्णच मानली जाते. आईस्क्रीमचे वेगवेगळे थर, फळे, जेली, सुकामेवा आणि रंगीबेरंगी सिरप यांचा समावेश असलेले हे डेझर्ट दिसायला आणि खायला अतिशय रंजक आहे. किनारपट्टीच्या कर्नाटकात 'गडबड' हे अत्यंत प्रतिष्ठित डेझर्ट मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news