Nashik Ice Cream Prices 2026 इराण-इस्रायल युद्धाचा आइस्क्रीम उद्योगाला चटका; दरही १५ ते २० टक्क्यांनी वाढले

Nashik Ice Cream Prices 2026 | युद्धाच्या झळा : कच्च्या मालाचा तुटवडा, बिस्किट कोन गायब
Nashik Ice Cream Prices 2026
Nashik Ice Cream Prices 2026
Published on
Updated on

Impact of Iran Us Israel War on Ice Cream In Maharashtra

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्याच्या हंगामात प्रत्येकालाच थंडगार पदार्थ खावेसे वाटतात. त्यातही आइस्क्रीम हा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचाच आवडता पदार्थ. मात्र, यंदा आइस्क्रीम इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धामुळे भाव खात आहे.

Nashik Ice Cream Prices 2026
Nashik Kumbh Mela 2027 Railway| कुंभमेळ्याचा मार्ग मोकळा; नारायणगावात रेल्वेसाठी भूसंपादन पूर्ण

युद्धामुळे कच्च्या मालाच्या किमती भडकल्याने, आइस्क्रीमचे दरही सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. याशिवाय एलपीजी गॅसच्या सहाय्याने बनविल्या जाणाऱ्या आइस्क्रीमचा बिस्किट कोन गायब झाल्याने, बच्चे कंपनीचा काहीसा हिरमोड होत आहे. यंदा उन्हाचा वाढता तडाखा व घटलेल्या जीएसटीमुळे आइस्क्रीम विक्री जोमात होण्याची उत्पादक व विक्रेत्यांना अपेक्षा होती.

मात्र, मध्य पूर्वेत सुरू असलेले युद्ध व अवकाळी पावसाचे सावट यामुळे या उद्योगाला मोठा फटका बसत आहे. कोरोना व अवकाळी पाऊस यामुळे सलग तीन वर्षे नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाळ्याच्या हंगामात प्रत्येकालाच थंडगार पदार्थ खावेसे वाटतात. त्यातही आइस्क्रीम हा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचाच आवडता पदार्थ.

Nashik Ice Cream Prices 2026
Nashik Pune Railway | नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प आता केंद्राच्या ताब्यात! राज्य सरकारने 'महारेल'कडे मागितले 684 कोटी परत

मात्र, यंदा आइस्क्रीम इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धामुळे भाव खात आहे. युद्धामुळे कच्च्या मालाच्या किमती भडकल्याने, आइस्क्रीमचे दरही सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. याशिवाय एलपीजी गॅसच्या सहाय्याने बनविल्या जाणाऱ्या आइस्क्रीमचा बिस्किट कोन गायब झाल्याने, बच्चे कंपनीचा काहीसा हिरमोड होत आहे.

यंदा उन्हाचा वाढता तडाखा व घटलेल्या जीएसटीमुळे आइस्क्रीम विक्री जोमात होण्याची उत्पादक व विक्रेत्यांना अपेक्षा होती. मात्र, मध्य पूर्वेत सुरू असलेले युद्ध व अवकाळी पावसाचे सावट यामुळे या उद्योगाला मोठा फटका बसत आहे. कोरोना व अवकाळी पाऊस यामुळे सलग तीन वर्षे स्थानिक पातळीवर आइस्क्रीमनिर्मिती करतात. उर्वरित माल गुजरात, मध्य प्रदेशसह अन्य ठिकाणांहून येतो. दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यातील आइस्क्रीमची उलाढाल ७० ते ७५ कोटींपर्यंत जाते. यंदा मात्र, त्यात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

फेब्रुवारीमध्येच उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने, यंदाचा हंगाम चांगला असेल अशी अपेक्षा होती. मात्र, इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर प्रचंड वाढले आहेत, याशिवाय एलपीजी गॅसचाही तुटवडा आहे. त्याचा थेट परिणाम आइस्क्रीम उद्योगावर होत असून, युद्ध लवकर संपुष्टात यावे ही अपेक्षा.

आशिष नहार, राष्ट्रीय महासचिव, इंडियन आइस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news