

Guava Peel Uses and Benefits: पेरूला मीठ आणि चटणी लावून खाण्याची मजाच काही और...! घरातील लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना सहसा पेरू आवडतो. मात्र काही लोक पेरूचा गर खातात आणि बाहेरील साल फेकून देतात. ही बातमी जे पेरूची साल फेकून देतात त्यांच्यासाठी आहे. पेरूचे साल फक्त खाण्यासाठी किंवा कचऱ्याच्या डब्यातून फेकून देण्यासाठी नाही. मात्र त्याचा घरातील गार्डनिंगसाठी अत्यंत फायदेशीर उपयोग होते.
पेरूमध्ये अनेक पोषण मुल्ये असतात, नैसर्गिक सुगंध असतो. त्याचे अॅसिडिक गुणधर्म हे साफसफाई, रोपांची देखभाल आणि किचन हॅक्ससाठी उपयुक्त ठरतात. चला तर मग पेरूच्या भन्नाट उपयोगाबाबत जाणून घेऊयात.
पेरूच्या सालांपासून गॅलरीतील झाडांसाठी जैविक खाद्य तयार करता येते. पूरूच्या सालांचे बारीक तुकचे करून ते जैविक खतात मिसळा. हे पेरूचे साल झांडांसाठी नायट्रोजन आणि पोटॅशियम सारखे पोषण तत्वे देते.
पेरूच्या सालांमध्ये पाणी आणि जालचीनी किंवा लवंग टाकून ते उकळा. याच्या वाफेमुळं घरात सुगंध पसरतो. हवेतील दुर्गंध कमी होते आणि हवा फ्रेश होते.
पेरूच्या सालांपासून तुम्ही उत्तम आणि सुवासिक क्लीनर बनवू शकता. यासाठी पेरूचे साल पाण्यात उकळा. त्यात लिंबूचा रस आणि डेटॉल मिसळा. हे मिश्रण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ठेवा, या मिश्रणाचा वापर फ्रीज, मायक्रोवेव्ह आणि घरातील इतर गोष्टी साफ करण्यासाठी वापरू शकता.
पेरूच्या सालांपासून तुम्ही भांड्यांची दुर्गंधी दूर करू शकता. विशेषकरून नॉन व्हेज जेवणानंतर किंवा अंडी तयार केल्यानंतर भांड्यांना एक तीव्र दुर्गंधी पसरते. अशावेळी तुम्ही भांडी साबणाने धुतल्यानंतर पेरूच्या सालांनी घासा. यातील दुर्गंधी त्वरित गायब होते.