Black Diamond Guava | पेरु आहे की सफरचंद, वरुन ब्लॅकिश रेड तर आतून हलका गुलाबी!

Namdev Gharal

आपण सर्वसाधारण पेरु हा हिरवा पिकला तर पिवळसर अशा स्वरुपात अनेकदा पाहिला आहे पण सध्या मार्केटमध्ये एका सफरचंदासारख्या गडद जांभळ्या-काळपट, लालचूटूक पेरुची चर्चा सुरु आहे

या पेरुचे नाव आहे ब्लॅक डायमंड (Black Diamond Guava). या पेरुची सध्या फळबागायत क्षेत्रात सध्या प्रचंड चर्चेत आहे. ही एक दुर्मिळ आणि आकर्षक विदेशी जात आहे. ही जात थायलंडमध्ये डेव्हलप केली आहे

झाडाचे प्रत्येक अंग रंगीतः या जातीचे केवळ फळच नाही, तर पाने, फांद्या, फुले आणि अगदी कच्च्या कळ्याही गडद जांभळ्या किंवा महिरूण रंगाच्या असतात.

या पेरुचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे याचे झाड दिसायला अतिशय देखणे असल्याने हे झाड बागेत शोभेसाठी म्हणूनही लावले जाते.

या पेरु बाहेरुन गडद सफरचंदासारखा दिसतो, फळाची बाहेरची त्वचा गडद जांभळी/काळी असते, तर आतील गर गडद गुलाबी किंवा लाल रंगाचा असतो.

चवीला गोड बियाही कमी : चवीला हा पेरू अत्यंत गोड, रसाळ आणि हलकासा सुगंधी असतो. बियांचे प्रमाणही नेहमीच्या पेरूपेक्षा कमी असते.

गडद रंगामुळे यात अँथोसायनिन (Anthocyanin) आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण प्रचंड असते. हे फळ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, त्वचेच्या आरोग्यासाठी आणि शरीरातील पेशींचे नुकसान रोखण्यासाठी गुणकारी मानले जाते.

कलमी रोपे लावल्यानंतर अवघ्या १ ते २ वर्षांत फळधारणा सुरू होते. कुंडीत (Bonsai/Terrace garden) सुद्धा हे सहज लावता येते.

दुर्मिळ जात आणि आकर्षक रंग-रूप यामुळे बाजारात या पेरूला आणि त्याच्या कलमांना नेहमीच्या जातींपेक्षा कितीतरी पटीने अधिक दर मिळतो.