पुढारी वृत्तसेवा
सध्या बद्धकोष्ठता हा अनेकांना असलेला त्रास आहे. खाण्यापिण्याच्या सवयी, फास्टफूट, मैद्याचे पदार्थ यामुळे अनेकांना दररोज पोट साफ होण्याची औषधे घ्यावी लागतात
पण आर्युवेदात याचा एक भन्नाट उपाय सांगितला आहे तो म्हणजे रोज एक पेरु खाणे, पेरु हे असे फळ आहे ज्याचे अनेक फायदे आहेत पण पोट साफ होण्यासाठी हा रामबाण उपाय ठरतो
एका मध्यम आकाराच्या पेरूमध्ये सुमारे ३ ते ९ ग्रॅम फायबर असते (दैनंदिन गरजेच्या १२%). हे फायबर आतड्यांची हालचाल सुरळीत करून पोट साफ करण्यास मदत करते.
पेरूमध्ये 'पेक्टिन' नावाचे विद्राव्य फायबर (Soluble Fiber) असते. हे आतड्यांमधील पाचक रसांचे प्रमाण वाढवून अन्न सहज पुढे ढकलण्यास मदत करते.
पेरूमध्ये सुमारे ८०% पाणी असते. हे शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि आतड्यांमधील मल कोरडा किंवा कडक होण्यापासून रोखते.
पेरूच्या बिया चघळून किंवा गिळून खाल्ल्यास त्या उत्तम 'रफेज' म्हणून काम करतात. यामुळे आतड्यांची स्वच्छता होण्यास मदत होते (परंतु अतिप्रमाणात बिया खाणे टाळावे).
सकाळी किंवा दुपारी जेवणापूर्वी / जेवणानंतर १ तासाने पेरू खाणे योग्य ठरते. पेरू नेहमी मीठ किंवा काळे मीठ लावून खाल्लास पचन आणखी चांगले होते. रात्रीच्या वेळी पेरू खाणे टाळावे.
पित्त असणाऱ्या व्यक्तिने पेरु खाल्यास पित्ताचा त्रास हळूहळू मुळापासून कमी होतो
पण एक काळजी घेणे आवश्यक आहे सर्दी किंवा सायनस असलेल्या लोकांनी पेरु खाणे टाळले पाहिजे किंवा कमी प्रमाणात खाल्ला पाहिजे