Onion Juice for Hair Growth : पावसाळ्यात केस गळतीने हैराण आहात? कांद्याचा रस असा लावा, केसगळतीपासून मिळेल आराम..

योग्य पद्धतीने कांद्याचा रस वापरल्यास केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
Onion Juice for Hair Growth
पावसाळ्यात केस गळतीने हैराण आहात? कांद्याचा रस असा लावा, केसगळतीपासून मिळेल आराम..file photo
Published on
Updated on

Onion Juice for Hair Growth

पुढारी ऑनलाईन : Onion Juice for Hair Growth: कांद्याच्या रसामध्ये सल्फर, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर अनेक पोषक घटक असतात. हे घटक केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना मजबूत ठेवण्यास मदत करतात. योग्य पद्धतीने कांद्याचा रस वापरल्यास केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

Onion Juice for Hair Growth
Hair Care : केस पूर्ण कापल्याने ते खरंच दाट होतात? जाणून घ्या सत्य की फक्त गैरसमज

लांब, दाट आणि चमकदार केस प्रत्येकालाच हवे असतात. मात्र आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, अयोग्य आहारामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे केस गळणे, केस पातळ होणे आणि अकाली पांढरे होणे यांसारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. अशा वेळी स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या कांद्याचा रस केसांच्या निगेसाठी उपयुक्त ठरू शकतो.

केसांसाठी कांद्याचा रस कसा तयार करावा?

२ ते ३ कांदे सोलून त्यांचे लहान तुकडे करा. हे तुकडे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. तयार झालेला लगदा मलमलच्या कपड्यातून किंवा बारीक गाळणीने गाळून त्याचा रस काढा. इच्छित असल्यास हा रस काही वेळ फ्रिजमध्ये ठेवू शकता.

कांदा आणि मधाचा हेअर मास्क

२ चमचे कांद्याच्या रसामध्ये १ चमचा मध घालून चांगले मिसळा. हे मिश्रण केसांच्या मुळांवर आणि टाळूवर लावा. सुमारे २० मिनिटे तसेच ठेवून नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. हा हेअर मास्क केसांना चमक देण्यास, टाळूचे आरोग्य सुधारण्यास, कोंड्याची समस्या कमी करण्यास आणि केसांच्या वाढीस मदत करू शकतो.

Onion Juice for Hair Growth
Hair Care : शॅम्पू-साबण नव्हते तेव्हा लोक केस कसे स्वच्छ करायचे? जाणून घ्या जुन्या काळातील रहस्य

कांदा आणि कोरफडीचा (ॲलोवेरा) हेअर मास्क

कांद्याचा रस तयार करून त्यात समान प्रमाणात अॅलोवेरा जेल मिसळा. इच्छेनुसार त्यात २ ते ३ थेंब ऑलिव्ह ऑइलही घालू शकता.

केसांचे छोटे-छोटे भाग करून हे मिश्रण टाळूवर लावा आणि २ ते ३ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. किमान ३० मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून १ ते २ वेळा हा उपाय करू शकता.

कांदा आणि अंड्याचा हेअर मास्क

१ मोठा चमचा कांद्याचा रस आणि १ पूर्ण अंडे घेऊन दोन्ही चांगले फेटा. तयार मिश्रण केसांच्या मुळांपासून संपूर्ण केसांवर लावा.

यानंतर शॉवर कॅप घाला आणि २० ते ३० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर थंड पाणी आणि सौम्य शॅम्पूने केस धुवा.

अंड्यामधील प्रथिने केसांना पोषण देण्यास मदत करतात, तर कांद्याचा रस केसांच्या मुळांना बळकट करण्यास सहाय्य करतो.

या गोष्टींची काळजी घ्या

कांद्याची अॅलर्जी असल्यास हा उपाय करू नका.

टाळूवर जखम, संसर्ग किंवा गंभीर त्वचेची समस्या असल्यास कांद्याचा रस वापरणे टाळा.

प्रथमच वापरत असाल तर आधी पॅच टेस्ट करा.

तीव्र जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास लगेच स्वच्छ पाण्याने धुवून टाका.

टीप : कांद्याच्या रसामुळे काही लोकांमध्ये केसांच्या वाढीस मदत होऊ शकते, मात्र याबाबतचे वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत. केस गळती जास्त प्रमाणात होत असल्यास किंवा दीर्घकाळ समस्या कायम असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news