New MG Electric Car : ‘एमजी’ची दुसरी इलेक्ट्रिक कार भारतात होणार लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

New MG Electric Car : ‘एमजी’ची दुसरी इलेक्ट्रिक कार भारतात होणार लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : एमजी मोटर इंडिया कंपनी 2023 च्या सुरुवातीला आपली दुसरी नवी इलेक्ट्रीक कार लॉन्च करणार आहे. ही एक कॉम्पॅक्ट सिटी कार असणार आहे. इंडोनेशियामध्ये झालेल्या G20 शिखर संमेलनामध्ये Wuling Air EV हे कार मॉडेल पाहायला मिळाले. याच Wuling Air EV कारची पुनरावृत्ती एमजी कंपनी करणार आहे. MG Air EV असे या कारचे नाव असू शकेल, मात्र कंपनी याबाबत दुसऱ्या नावाचा देखील विचार करत आहे. या बातमीतून विशेष फिचर्ससह कारविषयीची इतर माहिती घेऊया. (New MG Electric Car)

ही नवी कार ग्लोबल स्मॉल इलेक्ट्रिक व्हेइकल्स (GSEV) या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. आकर्षक अशा डिझाइनने सुसज्ज असणारी ही कार असणार आहे. भारतात, या कॉम्पॅक्ट EV ला E230 असा मॉडेल नंबर देण्यात आला आहे. त्याचबरोबर एम कंपनी या कारचे Air EV हे नाव न वापरता वेगळे नाव देण्याचा विचार करत आहे. 5 जानेवारीला ही नवी कार भारतात लॉन्च होईल, अशी प्राथमिक माहिती आहे. (New MG Electric Car)

G20 परिषदेत पहायला मिळालेल्या Wuling Air EV Car 

MG Air EV Car : आकार

एमजी मोटर आगामी काळात कारचा आकार हा वुलिंग एअर कार इतकीच असणार आहे. याची लांबी 2,974 mm, 1,505 mm आणि उंची 1,631 mm व्हिलबेस 2,010 इतक्या आकाराची असेल. ही कार Tiago EV पेक्षाही लहान असणार आहे.PMV Electric च्या Ease या कारशी मिळत्या जुळत्या असणार आहेत.

MG Air EV Car : बॅटरी पॉवर

Wuling Air EV दोन बॅटरी पॅकसह उपलब्ध असणार आहे. यामध्ये 17.3 kWh आणि 26.7 kWh अशा दोन लहान मोठ्या युनिटचा समावेश असेल. यातील छोटी बॅटरी ही 200 km पर्यंतची रेंज देईल तर मोठी बॅटरी 300km पर्यंतची रेंज देईल. दोन्ही बॅटरी पॅकमध्ये 41 PS पॉवर जनरेट करणारी इलेक्ट्रिक मोटर असणार आहे.

किंमत किती असेल ?

MG Motor India ने घोषणा केली आहे की ते Wuling Air EVया कारवर आधारित आगामी नवी इलेक्ट्रिक कार असेल. ही कार पुढील वर्षी जानेवारीमध्ये लॉन्च करण्यात येईल. दिल्लीतील 2023 ऑटो एक्स्पो दरम्यान कारला प्रदर्शित देखील केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. MG च्या Air EV मॉडेलची किंमत सुमारे 10 लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल असा प्राथमिक अंदाज आहे.

MG च्या कारशी स्पर्धा करणाऱ्या भारतातील इतर कार

यापूर्वी कंपनीने MG ZS EV ही प्रीमियम सेगमेंटमध्ये पहिली कार लॉन्च केली. त्यानंतर आता आगामी MG Air EV ही नवी कार आणणार आहे. भारतात या कंपनीच्या कारशी स्पर्धा करणाऱ्या Tata Tiago EV आणि Tata Tigor EV या कार मॉडेल आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news