Ajay Devgn New Car : अजय देवगणची नवी इलेक्ट्रीक कार; ३१ इंची टीव्ही स्क्रीनसह विविध फिचर्स,पहा फोटो

Ajay Devgn New Car : अजय देवगणची नवी इलेक्ट्रीक कार; ३१ इंची टीव्ही स्क्रीनसह विविध फिचर्स,पहा फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक अजय देवगण (Ajay Devgn New Car) सध्या इलेक्ट्रिक कारच्या प्रेमात पडला आहे. संपूर्ण जग सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहे. अजय देवगणनेही स्वत:साठी इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. या भोला आणि सिंघम स्टारने BMW i7 ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान खरेदी केली आहे. या कारची किंमत आणि फिचर ऐकून चाहते देखील अजयच्या नव्या कारवर फिदा झालेले आहेत. विशेष म्हणजे या महागड्या इलेक्ट्रीक कारमध्ये एक मोठी टीव्ही स्क्रीन आहे.

BMW i7 या कारची किंमत 1.95 कोटी रुपये आहे (एक्स-शोरूम). ही इलेक्ट्रिक सेडान ट्वायलाइट पर्पल पर्ल मेटॅलिक कलरमध्ये उपलब्ध आहे. BMW ची ही इलेक्ट्रिक सेडान लक्झरी लुक आणि विविध फिचर्ससह सुसज्ज आहे. BMWच्या या इलेक्ट्रिक कारची मर्सिडीज-बेंझ EQS 580, Porsche Taycan आणि Audi e-tron GT सारख्या लक्झरी इलेक्ट्रिक कारशी स्पर्धा आहे.

कारमध्ये ३१ इंच टीव्ही

सध्या BMW i7 बद्दल बोलायचे तर, ऑल-इलेक्ट्रिक लक्झरी फ्लॅगशिप सेडानला कंपनीच्या सिग्नेचर ग्रिल्स मिळतात. आकर्षक अशी याची रचना आहे. स्पोर्टिंग ब्लू हायलाइट्स आणि नवीन अॅलॉय व्हील्स तसेच 'i' इनसिग्निया अशा फिचर्सनी ही कार सुसज्ज आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरच्या बाजूलाच इंन्फोटेंनमेंट सिस्टीम आणि एक वक्राकार स्क्रीन आहे. या स्क्रीनचे लांबी-रुंदीचे आकारमान पाहता अनुक्रमे 12.3-इंच आणि 14.9-इंच इतके आहे.

BMW च्या या इलेक्ट्रिक सेडानच्या इन्फोटोंनमेंटमध्ये iDrive 8 ऑपरेटिंग सिस्टीम आहे. केबिनमध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी Amazon Fire TV सपोर्टसह 31.3-इंच 8K सिनेमा स्क्रीन आहे. ही स्क्रीन छताला जोडलेली आहे. हवी तेव्हा ही स्क्रीन वर-खाली करता येते. मागील दरवाज्यात इन्फोटेनमेंट सिस्टम तसेच तापमान आणि आसन बदलासाठी 5.5-इंच टचस्क्रीन समाविष्ट आहे. (Ajay Devgn New Car)

Ajay Devgn New Car : BMW i7 च्या बॅटरीची क्षमता आणि वेग

BMW i7 101.7kWh लिथियम-आयन बॅटरीद्वारे समर्थित आहे. ही एका चार्जवर 591 ते 625 किमी इतके मायलेज देते. ही कार दोन इलेक्ट्रिक मोटर्सद्वारे समर्थित आहे. या मोटर 544 hp पॉवर आणि 745 Nm पीक टॉर्क जनरेट करतात. i7 चा कमाल वेग 239 kmph इतका आहे. ही इलेक्ट्रिक सेडान वेगवान चार्जरच्या मदतीने केवळ 34 मिनिटांत 10-80% पर्यंत चार्ज केली जाऊ शकते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news