Car Drivers Precautions : उन्हाळ्यात कार चालकांनी कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या अधिक माहिती

Car Drivers Precautions : उन्हाळ्यात कार चालकांनी कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या अधिक माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या महाराष्ट्रासह सगळीकडे उष्णतेची लाट पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कडक उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी उष्माघात जीवावर बेतल्याची उदाहरणे ताजी आहेत. त्यामुळे उष्णतेच्या तडाख्यातून आपला बचाव करण्यासाठी अनेक लोक आता चारचाकीचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत कार चालवत असताना कडक उन्हापासून आपला बचाव करुन घेणं गरजेचं आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. या बातमीतून जाणून घेऊया उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कारचालकांनी कोणती काळजी घ्यावी. (Car Drivers Precautions)

कारचालकांनी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गाडीची सर्व कामे करुन घेणे ही सर्वात महत्त्वाची काळजी आहे. कारण जर तुम्ही एखाद्या ठिकाणी रखरखत्या उन्हात जात असाल आणि तुमच्या गाडीमध्ये काही बिघाड झाला तर याचा खूप त्रास सहन करावा लागेल. बऱ्याचदा कार खरेदी केल्यानंतर 3 फ्री सर्व्हिसिंग वेळेत करून घेतली जातात. मात्र, त्यानंतर नियमितपणे सर्व्हिसिंग केले जात नाही. त्यामुळे असं न करता याबाबत जागृत राहणे आवश्यक आहे. (Car Drivers Precautions)

Car Drivers Precautions : उन्हाळ्याच्या दिवसांत कारमधील तांत्रिक बाबींची काळजी कशी घ्याल

  • एसीचे सर्व्हिसिंग करून घ्या : उन्हाळ्यात कार थंड होण्यासाठी एसीवर खूप दबाव असतो. म्हणूनच एसीची सर्व्हिस जरूर करून घ्या. हे तुम्हाला एसीचे आयुष्य वाढवण्यासोबतच कार व्यवस्थित थंड ठेवण्यास मदत करेल. (Car Drivers Precautions)
  • कार मधील कुलंट सिस्टीम : कुलंट ऑईलची तपासणी करणे, होजेसकडे लक्ष देणे, कुठे छोटे क्रॅक नाहीत ना याची तपासणी करणे, सर्व जॉइन्ट्स व्यवस्थित आहेत ना याची खात्री करून घेणे.
  • कार सावलीत पार्क करा : उन्हाळ्यात कारला पेंट खराब होण्याचा धोका असतो. तसेच केबिन खूप लवकर गरम होते. हे टाळण्यासाठी सावलीत गाडी पार्क करण्याचा प्रयत्न करा.
  • होजेस आणि बेल्ट: उष्णतेमुळे कारच्या होसेस आणि बेल्टचे नुकसान होते. त्यामुळे वेळोवेळी ते तपासत राहा आणि ते खराब झाल्यास लवकरात लवकर बदला. होज इंजिन ब्लॉकला जेथे जोडलाय तो ढिला तर झाला नाहीय ना याची खात्री करून घेणे, हे अतिशय महत्वाचे आहे. इंजिन थंड असताना होज हातांनी दाबून बघितल्यावर मऊ किंवा स्पंजा सारखा वाटत असेल तर त्वरित बदलून घेणे.
  • इंजिनबेल्ट : कारचा इंजिनबेल्ट जो कारच्या अल्टनेटर, फॅन आणि इतर कॉम्पोनंट मधून सर्पाकार फिरत असतो, तो ठीक आहे की नाही? त्याची झीज किंवा खराब झाले आहेत का? क्रॅक कोठे आहे का? याची खात्री करून घ्यावी. तसे काही आढळल्यास इंजिनबेल्ट वेळेवर बदलून घेणे आवश्यक आहे. (Car Drivers Precautions)
  • कार पॉलिश करा : उन्हाळ्यात कारचा रंग खराब होण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी, कारला अल्ट्राव्हायोलेट यूव्ही संरक्षणासह पॉलिश करा. यामुळे कारचा रंग खराब होणार नाही. यामुळे उन्हापासून संरक्षण करता येईल. (Car Drivers Precautions)
  • वायपर्स : गाडीच्या काचा साफ करण्यासाठी वायपर्स चालू स्थितीत असणे आवश्यक आहे. उन्हात काचेवर धूळ जमा होते आणि गाडी चालवताना अडथळा निर्माण होतो. हाच त्रास पावसाचे पाणी काचेवर जमा झाल्यास, अथवा हिवाळ्यात धुक्यामुळे काच धुरकट झाल्यावर देखील जाणवतो. अशावेळी वायपर्स चालू करून काच स्वच्छ करणे गरजेचे आहे. त्यामुळे याची निगा राखणे देखील महत्त्वाचे राहील. वायपर्समध्ये अडकलेला कचरा रोजच्यारोज साफ करणे, तसेच कार सुरू करण्यापूर्वी स्वच्छ आहेत का याची खात्री करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. तसेच वायपर्सचे रबर लायनिंग खराब असेल तर काच व्यवस्थित स्वच्छ होत नाही.
  • टायर्स : टायर्स नेहमीच उत्तम स्थितीत असणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात टायरचा दाब अचानक वाढतो. बरेचसे अपघात टायर फुटल्याने होतात. टायरमधील हवेचा दाब नेहमीच तपासून बघावा. शक्य असल्यास टायरमध्ये नायट्रोजन भरावा.
  • गाडीची स्वछता : आपण गाडीच्या तांत्रिक गोष्टींची चर्चा केली. आता गाडीच्या स्वच्छतेकडे वळूया. बऱ्याच कार बाहेरून चकचकीत दिसतात परंतु आतून अतिशय घाण असतात. लहान मुले गाडीत बसल्यावर काहीनाकाही खात असतात. यातील बरेच खाद्यपदार्थ गाडीत सांडतात. त्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीयुक्त वासाला सामोरे जावे लागते. यासाठी गाडीची स्वच्छता महत्त्वाची आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news