पुढारी ऑनलाईन : भारतातील आघाडीची कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) त्यांच्या बलेनो आरएस (Baleno RS) मॉडेलच्या ७,२१३ कार्स परत मागवल्या आहेत. व्हॅक्यूम पंपमधील संभाव्य दोषामुळे ही वाहने परत मागवली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कंपनीने एका निवेदनात असे म्हटले आहे की कंपनीने २७ ऑक्टोबर २०१६ ते १ नोव्हेंबर २०१९ दरम्यान निर्मिती केलेल्या ७,२१३ बलेनो आरएस वाहनांमधील ब्रेक पार्टशी संबंधित दोष दूर करण्यासाठी ही वाहने परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे.
"ब्रेक फंक्शनला सहाय्य करणाऱ्या व्हॅक्यूम पंप (Parts) मध्ये संभाव्य दोष असण्याची शक्यता आहे. क्वचित प्रसंगी प्रभावित वाहनाला ब्रेक पेडल ॲप्लिकेशनमध्ये अधिक प्रयत्न करावे लागू शकतात," असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने ग्राहकांना आश्वासन दिले की प्रभावित वाहन मालकांना मारुती सुझुकीच्या अधिकृत डीलर वर्कशॉपकडून कारचा सदोष भाग (defective parts) बदलण्यासाठी कळवले जाईल. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
याआधी मारुतीने (Maruti Suzuki) जानेवारीच्या सुरुवातीला सुमारे १७ हजार वाहने परत मागवली होती. या वाहनांची निर्मिती ८ डिसेंबर २०२२ आणि १२ जानेवारी २०२३ दरम्यान केली होती. एअरबॅग कंट्रोलरमध्ये दोष आढळल्याने ही वाहने परत मागवली होती. त्यात Alto K10, S Presso, Eeco, Brezza, Baleno आणि Grand Vitara या वाहनांचा समावेश होता.
हे ही वाचा :