रितेश, तुझ्याबद्दल विचारच कोण करतेय! -जेनेलिया (Video)

रितेश, तुझ्याबद्दल विचारच कोण करतेय! -जेनेलिया (Video)

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया ही एक बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. बर्‍याचवेळा ते मजेशीर रिल व्हिडीओ करत असतात. नुकतेच रितेश आणि जेनेलिया यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ते दोघेही कुठेतरी फिरायला गेल्याचे दिसत आहे. यात जेनेलिया ही कोणत्या तरी विचारात मग्न असल्याचे दिसत आहे. त्यावेळी रितेश हा तिच्या मागून चालत येतो आणि तिला विचारतो, मला माहिती आहे, तू माझ्याबद्दल वाईट विचार करत आहेस? त्यावर जेनेलिया म्हणते, वाईट! तुझ्याबद्दल विचार करतेच कोण? तिची ही प्रतिक्रिया ऐकून रितेशला धक्का बसतो. यावेळी रितेशच्या प्रतिक्रियेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. रितेश आणि जेनेलियाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यावर कमेंट करत आहेत. काहींनी रितेश आणि जेनेलिया या जोडीचे कौतुक केले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news