Jason Roy in KKR : केकेआरमध्ये इंग्लंडच्या ‘या’ हिटरची एन्ट्री! | पुढारी

Jason Roy in KKR : केकेआरमध्ये इंग्लंडच्या ‘या’ हिटरची एन्ट्री!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jason Roy in KKR : श्रेयस अय्यर आणि शकिब अल हसन आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर केकेआरने इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जेसन रॉयला विकत घेतले आहे. फँचायझीने इंग्लिश खेळाडूसाठी 2.8 कोटी रुपये मोजले आहेत.

जेसन रॉय आयपीएल 2023 च्या लिलावात अनसोल्ड राहिला. त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. रॉयची मूळ किंमत दीड कोटी रुपये होती. आता मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे देऊन केकेआरने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले आहे. जेसन रॉयने आतापर्यंत कसोटी, वनडे, टी-20 आणि आयपीएलमध्ये एकूण 160 षटकार मारले आहेत. (Jason Roy in KKR)

रॉयची ताकद काय आहे? (Jason Roy in KKR)

रॉयची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची धडाकेबाज फलंदाजी. तो डावाची सुरुवात करायला येतो आणि झटपट धावा वसूल करतो. त्याच्याकडे मोठी खेळी खेळण्याची क्षमता आहे. रॉय जेव्हा फॉर्मात असतो तेव्हा तो कोणत्याही संघाच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडू शकतो.

रॉयची आयपीएल कारकीर्द

32 वर्षीय रॉयने आयपीएलमध्ये एकूण 13 सामने खेळले आहेत. यादरम्यान, त्याने 29.91 च्या सरासरीने आणि 129.02 च्या स्ट्राइक रेटने एकूण 329 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश असून 91 ही त्याची सर्वोच्च वैयक्तीक धावसंख्या आहे. रॉयने 2017 आणि 2018 च्या सीझनमध्ये आयपीएलमध्ये सहभाग घेतला होता. 2021 च्या मोसमात तो सनरायझर्स हैदराबादकडून खेळला होता. 2021 मध्ये, त्याने पाच सामने खेळले आणि एका अर्धशतकासह 150 धावा केल्या.

जेसन रॉयची टी-20 कारकीर्द (Jason Roy in KKR)

जेसन रॉयने इंग्लंडकडून 64 टी-20 सामने खेळले असून त्याने 8 अर्धशतकांसह 137.61 च्या स्ट्राइक रेटसह 1522 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 78 आहे. रॉयने टी-20 मध्ये 135 चौकार, तर 69 षटकार मारले आहेत.

Back to top button