Latest Fashion Trend : वेस्टर्न ड्रेस आणि पारंपरिक दागिन्यांचं फ्यूजन कधी ट्राय केलं का?

Latest Fashion Trend
Latest Fashion Trend

Latest Fashion Trend : लाईफ स्टाईलमधील बदलांबरोबर फॅशनविश्वही बदलत गेले. सध्या पाश्चिमात्य कपड्यांबरोबरच पारंपरिक दागिने घालण्याचा ट्रेंडही मोठ्या प्रमाणात दिसतो. त्यामुळे पारंपरिक, पण फॅशनेबल लूक मिळतो. पारंपरिक दागिने घालून फ्यूजन केले तर लूकही वेगळा दिसतो. पांढर्‍या रंगाच्या पेहरावावर विविध रंगांचे भारतीय रत्न खूप सुंदर दिसतात. आकर्षक योजना करून हे दागिने घातले तर सौंदर्यात वाढ होते. मोत्याने जडवलेले, सोन्याचे जास्त उंचीचे आणि अनेक थर असलेले हार जास्त उंचीच्या काळ्या रंगाबरोबर घालावेत, त्यामुळे शाही लूक मिळतो.

Latest Fashion Trend : टक्सीडो जंपसूटबरोबर लहान झुमका देतो वेगळाच लूक

पाश्चिमात्य शैलीच्या कपड्यांवर लहान झुमके किंवा छोटे कानातले किंवा कानातले लटकन घातल्यास लूक छान दिसतो. उदा. टक्सीडो जंपसूटबरोबर लहान झुमका घातल्यास वेगळाच लूक मिळतो. शॉर्ट जीन्स किंवा रिप्ड जीन्स वर पातळ पैंजण छान दिसतात. हे कॉम्बिनेशन आकर्षक दिसतेच; पण आजच्या जमान्यातला कूल लूकही दिसतो. चांदीचे पैंजण कॅज्युअल आणि फॉर्मल दोन्ही प्रसंगी घालता येऊ शकतात.

पारंपरिक चोकर पाश्चिमात्य कपड्यांबरोबर घालावेत. हिरेजडीत चोकर खोल गळ्याच्या किंवा ऑफ शोल्डर काळ्या रंगाच्या पेहरावासमवेत घालावे. त्यामुळे आकर्षक दिसालच; पण गर्दीत सर्वांपेक्षा वेगळ्या दिसाल. हल्ली विविध प्रकारचे नाकातल्या रिंग, चमक्या थोडक्यात नोजपिन्स बाजारात मिळतात. पाश्चिमात्य कपड्यांबरोबर त्या घातल्या तर चेहरा वेगळा दिसतो. पातळ किंवा जुन्या डिझाईनच्या नोजपिन जीन्स किंवा कॅज्युअल टीशर्ट बरोबर घालणे हा एक चांगला पर्याय आहे.

हे ही वाचलं का :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news