

भाज्या चिरण्याची एक विशेष शैली शिकून घेतल्यास स्वयंपाकघरातले हे कंटाळवाणे कामही छोटे आणि मजेचे होऊन जाईल. ओबडधोबडपणे चिरलेल्या, बेचव वाटणार्या भाज्याही चांगल्या वाटू लागतील. स्वयंपाक करताना बर्याचशा पदार्थांमध्ये विशिष्ट पद्धतीने भाज्या चिरण्याची आवश्यकता असते. त्यात चिरणे, कापणे, खिसणे, बारीक चिरणे, चकत्या करणे या सर्वांचा सराव केला पाहिजे. आपल्या घरात असलेल्या वस्तू वापरून या गोष्टी करता येतात. यातील पहिली वस्तू आहे अर्थातच सुरी. चांगल्या दर्जा सुरी ही स्वयंपाकघरातील आवश्यकता असते. चांगली मूठ असणारी उच्च कार्बन स्टील असणारी सुरी घ्या. त्या वर्षांनुवर्ष चांगल्या राहतात आणि सरावाने त्या वापरणेही सहजशक्य होते. (kitchen tips)
स्वयंपाक शिकणारी प्रत्येक मुलगी अथवा महिला पहिल्यांदा भाज्या कापण्यापासूनच सुरुवात करते. याचे कारणही हेच आहे. भाज्या कापणे या प्राथमिक टप्प्यांवर प्रभुत्व मिळविल्यास पुढील काम सोपे होते; अन्यथा पळायचे आहे पण बुटाची लेस कशी बांधायची हेच माहिती नाही अशी अवस्था होऊन बसते.
चॉपिंग बोर्ड किंवा कटिंग बोर्डवर भाजी ठेवून वरून खाली भाजी चिरण्यास सुरुवात करा. त्यामुळे भाजी एकसारखी चिरली जाईल. चकत्या केल्यानंतर त्या या बोर्डावर त्या आडव्या करा. भाजीच्या चकत्या करताना सुरीचे टोक मात्र कटिंग बोर्डवरुन उचलायचे नाही. सुरी मागेपुढे करत त्याखाली भाज्या सरकवून शेवटपर्यंत कापा, पण सुरी मात्र बोर्डवरून उचलू नका.
ज्युलिनन म्हणजे लांब लांब पट्ट्यांसारखे कापणे. यामध्ये पातळ एकसारख्या पट्टया कापणे हे महत्त्वाचे असते. भाज्यांचे देठ कापून घ्या. त्यानंतर भाज्या लांब पट्ट्यांसाख्या चिरून घ्या. सलाड, सूपमध्ये वापरण्यासाठी आणि तळून खाण्यासाठी अशा प्रकारच्या भाज्या उपयोगी ठरतात.
चाकूने भाज्यांचे चौकोनी तुकडे करण्याच्या पद्धतीला डायसिंग म्हणतात. भाज्या चांगल्या दिसाव्यात किंवा एकसारख्या दिसाव्यात यासाठी हे वापरले जाते. त्यामुळे पदार्थ लवकर शिजतोच पण त्याची चव आणि सुगंध एकसारखा पसरतो, असे मानले जाते. बहुतेकदा भाज्या करण्यासाठी अशा प्रकारे चौकौनी तुकडे केले जातात. पण मांस किंवा मासे किंवा फळे यांच्यासाठी सुद्धा ह्याचा वापर करता येऊ शकतो.
पदार्थ बारीक वाटणे किंवा एकसारखा बारीक करणे म्हणजे मिन्सिंग. चकत्या किंवा चिरणे याहीपेक्षा भाज्या बारीक करण्यासाठी बर्याचदा शेफ नाईफचा किंवा फूड प्रोसेसरचा वापर केला जातो. मांस बारीक करायचे असेल त्यासाठी खास मांस बारीक करणारे ग्राईंडर उपलब्ध असतात. लसूण बारीक करण्यासाठी मोठ्या शेफ नाईफने तो लगदा होईपर्यंत दाबतात आणि मग चिरतात. आपल्याला जितका अधिक बारीक हवा त्यापद्धतीने ही प्रक्रिया केली जाते.
काही हिरव्या पालेभाज्या लांब पातळ चिरणे म्हणजे शिफोनेड. यामध्ये भाज्यांची पाने गोल गुंडाळून त्या गोल बारीक चिरल्या जातात. पातळ पॅनकेक किंवा ऑम्लेटच्या लांब पट्ट्या कापण्यासाठी हे तंत्र आपण वापरू शकतो.
हेही वाचा