Kitchen Tips : लोखंडी कढई कशी वापरावी?

Kitchen Tips : लोखंडी कढई कशी वापरावी?
Published on
Updated on

Kitchen Tips : लोखंडी कढईत शिजवलेला पदार्थ आपल्याला लोहाचा पुरवठा करतो. बर्‍याच घरांमध्ये आजही लोखंडी कढई किंवा तव्याचा वापर केला जातो. ही भांडी बराचकाळ टिकून राहतात. नेहमीच्या वापराने ही भांडी थोडी खराब होतात, पण योग्य रीतीने साफसफाई केल्यास ती वर्षांनुवर्ष टिकू शकतात.

लोखंडी कढईचा वापर केल्यानंतर लगेचच घासून ठेवावी. ही भांडी पाण्यात भिजत ठेवू नयेत. अन्यथा त्यांना गंज पकडतो.
एखाद्या कडक ब्रशने किंवा स्पंजने ही भांडी साफ करावी. ही भांडी डिशवॉशरमध्ये टाकू नका. स्टीलची घासणी आणि साबण यांच्या वापरामुळे ही भांडी खराब होण्याची शक्यता असते. या भांड्यांमध्ये चिकटलेले अन्न काढण्यासाठी खडे मीठ आणि पाण्याचे मिश्रण वापरा. पदार्थ चिकटून वाळून गेला असेल तर त्या भांड्यात पाणी उकळवा. तो पदार्थ निघून जाईल. कमी गॅसवर ठेवून किंवा कपड्याने कोरडे करूनच ही भांडी ठेवावीत.

या भांड्याला पेपर नॅपकिनने थोडेसे तेल आतून बाहेरून लावून ठेवावे. त्यामुळे गंज चढत नाही. ही भांडी नेहमी कोरड्या जागी ठेवावीत.  मुख्य म्हणजे या भांड्यांचा वापर शक्यतो अन्न शिजवण्यासाठीच करावा. साठवणुकीसाठी करू नये. पदार्थ शिजवून झाल्यानंतर तो तत्काळ दुसर्‍या भांड्यांमध्ये काढून ठेवावा. भाजी, आमटी यांच्यासारखे पदार्थ रात्रभर लोखंडी कढई अथवा इतर लोखंडी भांड्यांमध्ये राहिल्यास काळे पडतात.

– राधिका बिवलकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news