'या' स्मार्ट किचन टीप्स, नक्की वापरून पाहा.

साखरेत मुंग्या होऊ नयेत म्हणून, साखरेच्या डब्यात ४-५ लवंगा टाकूण ठेवाव्यात.

सूखे खोबरे तूरीच्या डाळित खुपसून ठेवले तर खराब होत नाही.

डाळ किंवा तांदूळाला किड लागू नये,म्हणून त्यात कडूलिंबाचा पाला घालावा.

हिंगाचा वास टिकवण्यासाठी हिंग तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवावा.

कढीपत्ता टिकवण्यासाठी त्याची पाने तेलात तळून, डब्यात भरुन ठेवावी

लिम्बाचा रस जास्त हवा असल्यास पाच-दहा मिनिटे लिम्बू कोमट पाण्यात भिजवून ठेवा आणि मगच रस काढा.