

What is CNAP: आता लोकांना अनोळखी नंबवरून कॉल आल्यावर कॉलवर कॉल करणाऱ्याचं नाव दिसत आहे. यासाठी कोणीही खास अॅप किंवा इंटरनेट सबस्क्रिप्शन घेतलेलं नाही. तरी हे नाव दिसत आहे. तर हे नाव दिसणे नुकतेच सुरू झालेल्या CNAP सर्व्हिसमुळं होत आहे. ही सुविखा सध्या ४ जी आणि ५ जी नेटवर्कवर मिळत आहे. मात्र यात काही आव्हाने देखील आहेत. चला तर मग हे फीचर कसं काम करतंय हे जाणून घेऊयात.
TRAI ने नुकतेच ग्राहकांसाठी नवी सेवा सुरू केली आहे. कॉलर नेम प्रेझेंटेशन अर्थात CNAP ही सेवा कॉलरची ओळख सांगते. आता कोणत्याही नंबवरून कॉल आला तरी त्याच्यावर नंबर ज्याच्या नावावर आहे त्याचं नाव दिसणार आहे. म्हणजे आता अनोळखी नंबवरून कॉल केला तरी त्या कॉलरचा नंबर आणि नाव दोन्ही तुमच्या स्क्रीनवर दिसणार आहे.
ही सेवा मोफत आणि सर्व ग्राहकांसाठी आहे. जर तुम्हाला ही सेवा मिळत नसेल तर ती सेवा येणाऱ्या काही दिवसात दिसायला लागेल. काही लोकं याला TrueCaller सारखी सेवा म्हणत आहे. मात्र TrueCaller आणि या सेवेमध्ये फरक आहे.
TRAI ने सांगितलं की CNAP एक अशी व्यवस्था आहे जी ग्राहकाला कॉलरचे अधिकृत रजिस्टर नावाची माहिती देतं. म्हणजे आलेल्या कॉलरचा नंबर हा कोणाच्या नावावर रजिस्टर आहे याची माहिती कॉल आलेल्या व्यक्तीला मिळते. जर तुम्ही तुमचा नंबर आई वडिलांच्या नावावर घेतला असेल तर कॉल केल्यानंतर नंबर सोबत त्यांचेच नाव दिसणार आहे.
मात्र ज्यांच्याकडे तुमचा नंबर सेव्ह असेल त्यांना तुमचे नाव त्यांनी ज्या नावाने सेव्ह केलं आहे तेच नाव दिसणार आहे. ही सेवा वापरण्यासाठी तुम्हाला इंटरनेट किंवा कोणत्याही अॅपची गरज लागणार नाहीये. किंवा सबस्क्रिप्शनची देखील गरज नाहीये. ही सेवा अगदी मोफत आणि सर्वांसाठी आहे.
सध्याच्या घडीला ही सेवा ४ जी आणि ५ जीवर मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसात जुन्या मॉडेल्सवर देखील ही सेवा मिळण्याची शक्यता आहे. CNAP नेटवर्क हे थेट टेलीकॉम इन्फ्रास्टक्चरद्वारे काम करतं. सर्व टेलिकॉम ऑपरेटर्स कोणत्याही नंबरचा डेटाबेस ठेवते.
हा नंबर कोणाच्या नावावर आहे आणि केवासी डेटा काय आहे ही माहिती टेलिकॉम ऑपरेटर्सना असते. ज्यावेळी एखादा व्यक्ती कॉल करतो त्यावेळी त्याच्या नेटवर्कवरून त्याचं नाव दिसतं. मात्र या सेवेची काही आव्हाने देखील आहेत.
CNAP साठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्याचे फीचर आहे. ही सेवा त्याच्या नंबर सोबत त्यांचं नाव दाखवतं ज्याच्या नावानं हा नंबर रजिस्टर आहे. मात्र जर रजिस्टर केलेलं नाव आणि वापर करणारा दुसराच असेल तर मात्र अडचण होते.
त्यामुळं लोकांना हा फ्रोड कॉल असल्याचं देखील वाटू शकतं. तो फ्रॉड कॉल असू देखील शकतो. मात्र प्रत्येक अनोळखी नंबरवरून आलेला कॉल फ्रॉड असू शकत नाही. ट्रु कॉलर तुम्हाला कॉलरचं नाव दाखवतं. दुसरीकडं CNAP तुम्हाला नोंदणी केलेलं नाव दाखवतं. त्यामुळे स्पॅम कॉल ओळखनं सहजासहजी शक्य होत नाही. तसंही true Caller देखील खूप अचूक आहे असं नाही. त्याच्यावर देखील विश्वास ठेवणं योग्य नाही.