Home Swapping: माझं घर तुला तुझं घर मला.... होम स्वापिंगचा हा नवा 'जुगाड' आहे तरी काय?

घर स्वापिंग करू इच्छित असलेल्या लोकांची मदत Kindred करत आहे.
Home Swapping
Home Swappingpudhari photo
Published on
Updated on

Home Swapping: आजच्या जगात ट्रॅव्हलिंग खूप महाग होत चाललं आहे. युरोप सारख्या देशात तर हॉटेलचे भाडे हे गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत एक नवा प्लॅटफॉर्म उभा राहत आहे. या प्लॅटफॉर्मचे नाव आहे किंड्रेड (Kindred) न्यू यॉर्क टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार लोक आता होम स्वॅपिंग सुरू केलं आहे. याद्वारे ते स्वस्तातलं अकॉमडेशन शोधत आहेत.

Home Swapping
CJI Surya Kant: निवृत्तीपूर्वी जज फारच 'षटकार' मारत आहेत... सर्वोच्च न्यायालयानेच अप्रत्यक्षरित्या न्यायव्यवस्थेतील भ्रष्ट कारभारावर ओढले ताशेरे

या घर स्वापिंग करू इच्छित असलेल्या लोकांची मदत Kindred करत आहे. ही एक रिटेल वेबसाईट असून गिव्ह टू गेट या मॉडेलवर ही वेबसाईट सुरू आहे. ही संकल्पना तुम्ही दुसऱ्यासाठी तुमच्या घराचे दरवाजे उघडता अन् त्याच्या बदल्यात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील दुसरा सदस्याच्या घरात राहण्याचा अधिकार तुम्हाला मिळतो.

हे फक्त एक सदस्यीय होम स्वॅपिंग नेटवर्क आहे. इथं लोक आपली घरे एकमेकांना एक्सचेंज करत स्वस्तात ट्रॅव्हलिंग करतात. किंड्रेडच्या मदतीनं युजर्स कोणतेही पैसे खर्च न करत जगभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थानिक लोकांसारखं राहू शकतात.

Home Swapping
गोवा : केंद्रातर्फे राज्याला ई-व्हिसाची भेट; युरोपातील पर्यटक वाढणार

किंड्रेड कसं काम करतं?

किंड्रेड ही एक विश्वासू होम एक्सचेंड कम्युनिटी आहे. ही कम्युनिटी २०२२-२३ च्या दरम्यान सुरू झाली आहे. हा प्लॅटफॉर्म रेंटर्स आणि होम ओनर्स दोघांनाही एक डिजीटल प्लॅटफॉर्म निर्मण करून देतं. हे जॉईन करण्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरावा लागतो.

तुमचं घर हे साफ-स्वच्छ, चांगल्या प्रकारे मेटेंन केलेलं असावं. तसंच ते ट्रॅवल फ्रेंडली देखील असावं. तुम्ही केलेला अर्ज अप्रुव्ह झाल्यानंतर तुम्ही या नेटवर्कचा भाग होऊ शकता. सध्याच्या घडीला किंड्रेडच्या जवळ २ लाख २० हजारापेक्षा जास्त घरे रजिस्टर आहेत. ही घरे जगभरातील १०० पेक्षा जास्त शहरात विखुरली आहेत. ही घरे जास्तकरून उत्तर अमेरिका अन् युरोपमध्ये आहेत.

Home Swapping
Election Holiday | सुट्टीचा मतदानासाठीच्या गोवा चेंबरकडून निषेध

एक रात्र घ्या एक रात्र द्या

किंड्रेडचा एक साधा नियम आहे. गिव्ह ए नाईट गेट नाईट. नवा सदस्याला सुरूवातीला ५ क्रिडिट्स मिळतात. याद्वारे तो होस्टिंग सुरू करण्यापूर्वी ५ नाईट्स कुठेही स्टे करू शकतो. ज्यावेळी तुम्ही तुमच्या घरात कोणालाही होस्ट करता त्यावेळी तुम्हाला एक नाईट क्रेडिट मिळते. या क्रेडिटद्वारे तुम्ही दुसऱ्या सदस्याच्या घरात राहण्यासाठी ते घर बुक करू शकता.

Home Swapping
Sesame seeds: या व्यक्तींनी चुकूनही तीळ खाऊ नये

कोणतेही कॅश ट्रान्सफर नाही

या घर स्वॅपिंगमध्ये कोणतेही कॅश ट्रान्फर होत नाही. गेस्ट फक्त क्लिनिंग फी आणि सर्व्हिस फी देतात. सरासरी एका आठवड्याच्या ट्रीपसाठी तुम्ही एकूण ५०० डॉलर्सपेक्षा कमी खर्च येतो. न्यूयॉर्कमध्ये हॉटेल या एअरबीएनबीसाठी जवळपास २००० डॉलर पेक्षा जास्त खर्च येऊ शकतो. क्रिंड्रेड प्रोफेशनल क्लिनिंगची देखील सोय उपलब्ध करून देते. होस्टला १ लाख डॉलर पर्यंत प्रोटेक्शन कव्हरेज देखील मिळतं. ट्रीपच्या पूर्वी व्हिडिओ कॉल द्वारे सदस्य एकमेकांना अप्रुव्ह देखील करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news