

Replace Passwords With New Passkey : तुम्ही सारखं पासवर्ड विसरता का..? इतके पासवर्ड झाले आहेत की कोणता पासवर्ड कोणत्या अकाऊंटचा आहे हेच समजत नाहीये... मात्र आता हीच डोकेदुखी गुगल आणि मायक्रोसॉफ्ट कमी करणार आहे. आता पासवर्ड ही कालबाह्य गोष्ट होण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्या पासवर्ड हा असुरक्षित आणि युजर एक्स्पिरियन्सच्या दृष्टीकोणातून फारच कमकवूत असल्याचं मान्य करू लागल्याआहेत.
त्यामुळेच आता Passkey आणि FIDEO आधारीत पासवर्डलेस लॉग इन सिस्टम वेगाने लागू केली जात आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट सारखे मोठे प्लॅटफॉर्म आता Passkey हा पर्यया सुरक्षित आणि फिशिंग प्रुफ म्हणून पुढे आणत आहेत.
FIDEO अलायन्सच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन वर्षात पासकीला सपोर्ट करणाऱ्या अकाऊंट्सची संख्या अब्जावधीत पोहचली आहे. गुगलने ते भविष्यात पासकीला डिफॉल्ट लॉग इन मानत आहे. तर मायक्रोस़ॉफ्ट नवीन युजर्सना पासवर्डशिवाय अकाऊट तयार करण्यास प्रोत्साहित करत आहे.
या इंडस्ट्रीमधला हा एक मोठा बदल आहे. कारण पासवर्डला हटवण्याचा प्रयत्न एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच होत आहे. Passkey द्वारे कोणत्याही अकाऊंट लॉग इन करणं खूप सहज आणि सुरक्षित आहे.
पासकी सिस्टमचा दावा आहे की ते फिशिंगपासून जवळपास पूर्णपणे सुरक्षित आहेत. यात पासवर्ड टाईप करण्याची किंवा लक्षात ठेवण्याची गरज लागत नाही. लॉग इन तुमच्या डिवाईस आणि बायोमॅट्रिकच्या धरतीवर होतं. यात फिंगरप्रिंट आणि फेस आयडी यासारख्या व्यवस्थांचा वापर होतो. त्यामुळे सायबर सुरक्षा तज्ज्ञ हे हा पर्याय सर्वात सुरक्षित मानतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचा फोनच तुमच्या पासवर्डसारखं काम करतो.
मात्र पासकी सारखी व्यवस्था भारतासारख्या देशात लागू करण्याच्या बाबतीत समस्या येऊ शकते. या तंत्रज्ञानाचा वापर फक्त वैयक्तिक फोनपुरताच मर्यादित नाहीये. भारतात फोन शेअर करणं ही खूप सामान्य गोष्ट आहे. एक डिवाईस घरातील अनेक लोकं वापरत असतात. सीम बदलणे फोन अपग्रेड करणे किंवा सेकंड हँड डिवाईस घेणं सामान्य गोष्ट आहे.
त्यामुळे पासकी ही सिस्टम डिवाईशी खोलवर इंटिग्रेटेड असते. जर तुमचा मोबाईल हवला, चोरी झाला किंवा खराब झाला तर युजरसाठी त्याचे अकाऊंट रिकव्हर कसे करायचे हा सर्वात मोठा प्रश्न असतो.
सध्या तरी पासकी रिकव्हर करण्याचा सहज उपाय सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाहीये. अनेक प्रकरणांमध्ये याची रिकव्हरी प्रोसेस इतकी कठिण होऊन बसते युजर हैराण होऊन जातात.
त्यामुळेच युएक्स रिसर्च रिपोर्टमध्ये सतत पासकी तंत्रज्ञान आत्मसात करण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा टेक्नॉलॉजी नाही तर अकाऊंट रिकव्हरी आहे.
ज्या देशात प्रत्येक युजरकडे पर्सनल फोन, क्लाऊड बॅकअप आणि मल्टी डिवाईस सिंक व्यवस्था उपलब्ध आहे तेच या पासकी सिस्टमचा सहत वापर करू शकतात. मात्र भारतातील प्रत्येक युजरकडे ही सुविधा असेल असं माननं खूप मोठी चूक ठरू शकते.