Google CEO सुंदर पिचाईंनी तीन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमधील 'ते' विधान ठरले खरे

कंपनीने गाठला तब्बल ४०० अब्ज डॉलर्सच्या महसुलाचा टप्पा!
Google CEO Sundar Pichai
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई.Pudhari Photo
Published on
Updated on

Google CEO Sundar Pichai

सॅन फ्रान्सिस्को: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) जागतिक शर्यतीत गुगल मागे पडत असल्याची टीका होत असताना, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई यांनी तीन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवला होता. यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना धीर देताना केलेले विधान आता वास्तवात उतरले आहे. गुगलची 'हळूहळू पण शाश्वत' प्रगतीची रणनीती यशस्वी ठरली असून, कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीत (Q4) ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.

काय म्हणाले होते सुंदर पिचाई?

फेब्रुवारी २०२३ मध्ये जेव्हा 'चॅटजीपीटी'ने जगभरात खळबळ माजवली होती, तेव्हा पिचाई यांनी एका अंतर्गत ईमेलद्वारे कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता. "आपल्यातील काही यशस्वी उत्पादने (उदा. Gmail, Chrome, Android) ही बाजारात सर्वात आधी आली नव्हती. मात्र, वापरकर्त्यांच्या गरजा ओळखून तांत्रिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी स्वतःचे वर्चस्व निर्माण केले," असे पिचाई यांनी १५ फेब्रुवारी २०२३ रोजी म्हटले होते. आज तीन वर्षांनंतर गुगलची स्थिती पाहता हा शब्द खरा ठरला आहे.

Google CEO Sundar Pichai
Sundar Pichai Salary: गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंना रेकॉर्ड ब्रेक पगार; आकडा ऐकून धक्का बसेल, सुरक्षेवरच 71 कोटी खर्च

'जेमिनी ३' (Gemini 3) ठरला 'टर्निंग पॉईंट'

नोव्हेंबर २०२५ मध्ये लाँच झालेला 'जेमिनी ३' हा गुगलसाठी 'टर्निंग पॉईंट' ठरला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जेमिनी ॲपच्या सक्रिय मासिक वापरकर्त्यांची संख्या वर्षाअखेर ७५ कोटींवर पोहोचली आहे. गुगलची मातृसंस्था (अल्फाबेट) ने इतिहासात प्रथमच ४०० अब्ज डॉलर्सचा वार्षिक महसूल टप्पा पार केला आहे. मॉडेल ऑप्टिमायझेशनच्या पूर्ण-स्टॅक पद्धतीमुळे जेमिनीच्या संचालन खर्चात ७८ टक्क्यांची मोठी घट झाली आहे.

Google CEO Sundar Pichai
Gemini AI For Free College Admission: कॉलेजमध्ये Gemini AI मिळवून देणार प्रवेश.... मोफत असणार सेवा, सुंदर पिचाईंनी दिली माहिती

जेमिनी ३ वापरकर्त्यांमध्‍ये लक्षणीय वाढ

चॅटजीपीटीचे साप्ताहिक ८० कोटी वापरकर्ते असले, तरी गुगलने आपल्या सर्च इंजिनमध्ये 'AI मोड' समाकलि केल्यामुळे ही दरी वेगाने कमी होत आहे. "जेमिनी ३ च्या लाँचिंगनंतर वापरकर्त्यांच्या सहभागात लक्षणीय वाढ झाली आहे," असे पिचाई यांनी बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.

Google CEO Sundar Pichai
"आठवीच्‍या वर्गातील मुलाला..." : वैभवच्‍या खेळीवर Google CEO सुंदर पिचाईही प्रभावित

यूट्यूब प्रीमियम आणि गुगल वनच्या माध्यमातून कंपनीला फायदा

केवळ एआय क्षेत्रातच नव्हे, तर यूट्यूब प्रीमियम आणि गुगल वनच्या माध्यमातून कंपनीने ३२.५ कोटी सशुल्क ग्राहक मिळवले आहेत. ही संख्या नेटफ्लिक्सच्या गेल्या महिन्यातील ग्राहकसंख्येच्या बरोबरीची आहे. याशिवाय, गुगलच्या वर्कस्पेस एआय परवान्यांच्या संख्येतही वाढ होऊन ती ८० लाखांवर पोहोचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news