

Meta Layoff Mark Zuckerberg: मेटाने नुकतेच रिअलिटी लॅब विभागातून अजून १००० कर्मचारी कपात करण्याचे जाहीर केलं. या कर्माचारी कपातीमागे अनिश्चिततेचे संकेत, ऑटोमेशन आणि मार्क झुकरबर्ग व्हर्चुअल रिअलिटी आणि मेटावर्समधून घेत असलेला काढता पाय ही कारणे सांगण्यात येत आहेत. दरम्यान, Oculus चे संस्थापक पाल्मर लकी यांनी झुकरबर्गच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
कधी काळी पाल्मर यांना त्यांच्या राजकीय कलामुळं झुकरबर्गने कंपनीतून काढून टाकलं होतं. पाल्मर यांनी या निर्णयामुळं मेटाला भविष्यात VR इकोसिस्टम बळकट करण्यास मदतच होणार असल्याचा दावा केला आहे.
पाल्मर यांनी भलीमोठी एक्स पोस्ट करत, 'ही कोणतीही आपत्ती नाहीये. त्यांच्याकडे अजूनही VR मधील सर्वात मोठी टीम आहे. इतर कोणतीही कंपनी त्यांच्या जवळपास देखील पोहचू शकत नाही. मेटा हे मेटा हे VR ची कल्पना गुंडळून ठेवणार हा प्रचार खोटा आहे.'
पाल्मर यांनी दावा केला की रिअलिटी लॅब विभागातून करण्यात आलेली कर्मचारी कपात ही जवळपास १० टक्के आहे. या कर्मचारी कपातीमुळे व्हीआर विकासातील मेटीच्या डोमिनंट पोजिशनवर काही परिणाम होणार नाही असा देखील दावा पाल्मर यांनी केला.
विशेष म्हणजे पाल्मर लकी हे कधी काळी मेटाच्या व्हीआरचा भाग रोहेत. मात्र ज्यावेळी मेटा फेसबुक म्हणून ओळखलं जात होतं त्यावेळी त्यांनी ट्रम्प समर्थक ग्रुपला डोनेशन दिल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यानंतर फेसबुकने आधी राजकीय लागेबांधे असल्याचे आरोप फेटाळले होते. मात्र त्यानंतर पाल्मर यांना २०१७ मध्ये काढून टाकण्यात आलं. मात्र असं असलं तरी सध्या पाल्मर आणि मेटा हे अधिकृतरित्या एकत्रित लष्करी तंत्रज्ञानाच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत.
दरम्यान, पाल्मर यांनी हे भाष्य मेटाच्या रिअलिटी लॅब रिस्ट्रक्चर आणि आर्थिक दबाव वाढत असताना केले आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार या विभागातून जवळपास १००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. हे कर्मचारी जवळपास १५ हजार लोकांना रोजगार देत होते. याबाबतची माहिती कर्मचाऱ्यांना इंटरनल पोस्टद्वारे देण्यात आली आहे. ही बातमी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर अँड्र्यू बॉसवर्थ यांनी दिली असल्याची माहिती मिळत आहे.