Health Tips : केळी खाल्ल्याने खरंच तुमचे वजन वाढते का?

केळी काऊन वजन घटवा
केळी काऊन वजन घटवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : केळी आपल्याकडे १२ महिने उपलब्ध असतात. काहींना केळी प्रचंड आवडतात; पण काहींना केळी आवडत असूनदेखील ते खाण्यावर नियंत्रण आणतात. वजन वाढतं म्हणून केळी खाल्ली जात नाहीत. (Health Tips) केळी खाल्ल्याने तुमचंही वजन वाढतं का? याविषयी जाणून घेवूया… (Health Tips)

वर्कआऊट करण्याआधी दोन केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. यामागे कारण आहे-ते म्हणजे केळींमधील कॅलरीज. केळी खाल्ल्यानंतर तुम्हाला वर्कआऊटसाठी एनर्जी मिळते. केळीत भरपूर कॅलरीज असतात. त्यामुळे केळी खाल्ल्यामुळे कॅलरीज वाढतील, असा अनेकांचा समज आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे, या कॅलरीज आपणास बर्नदेखील करता येतात. यासाठी खूप व्यायाम किंवा वर्कआऊट करायला हवाच, असे नाही. यातील गंमत काय पहा.

केळी खाताना एक किंवा दोनचं खावे. त्यामुळे एनर्जी तर मिळेलच. पण, कॅलरीज बॅलन्स होण्यासाठी तुम्हाला अन्य खाणं कमी करावं लागेल. १०० ग्रॅम केळीमधून ८८ कॅलरीज मिळतात. शिवाय बिस्किटे, मैद्याचे पदार्थ, पापडी, फरसाणा, भजी, तळलेले पदार्थ, बाहेरचं खाणं फास्ट फूड वगैरे खाणे टाळावे. यापेक्षा एक-दोन केळी खाल्लेली कधीही चांगले. याने तुमचे पोट भरेल आणि तुमच्याकडून इतर पदार्थ खाल्ले जाणार नाहीत. शिवाय तुम्हीही दिवसभर उत्साही राहाल. त्यामुळे केळी खा असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

केळी खाऊन वजन घटवा

जे वजन कमी करू इच्छितात आणि त्यासाठी ते डाएट आणि वर्कआऊट करतात, त्यांनी तर केळी खावीच. जे खेळाडू असतात, त्यांनाही केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. वरील ट्रिकप्रमाणे केळी खाऊन वजन नियंत्रणात ठेऊ शकतो. किंबहुना ते कमीदेखील करू शकतो. पण, त्यासाठी आपण तसे प्रयत्नदेखील करणं गरजेचं आहे.

केळ्याचे शिकरण करू नये

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे केळ्याचे शिकरण कधी करू नये. दुधामध्ये कुठलेही फळ घालून खाऊ नये, असे आपले आयुर्वेद सांगते. दुथातील शिकरण हा विरोधी आहार असल्याचे म्हटले जाते. यास एकच फळ अपवाद आहे – ते म्हणजे आंबा. तोही गोड असावा लागतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news