employee fired for being late: सात वर्षाची नोकरी... एक दिवस फक्त २० मिनिट लेट; कंपनीने घरचा रस्ता दाखवला थेट

employee fired for being late
employee fired for being latepudhari photo
Published on
Updated on

Layoff Controversy employee fired for being late: कामाच्या ठिकाणी वेळवर पोहचणं हा एक शिष्टाचाराचा आणि शिस्तीचा भाग आहे. वेळेच्या बंधनामुळं कंपनीचे काम योग्य प्रकारे सुरू राहते आणि कर्मचाऱ्यांवर देखील अतिरिक्त दबाव येत नाही. मात्र कधी कधी थोडा उशीर झाला तरी कंपनी ही गोष्ट समजून घेत असते. मात्र जर एखाद्या कर्मचारी एक दिवस थोडा उशिरा आला आणि कंपनीनं त्याला थेट नोकरीवरूनच काढून टाकलं तर याबाबत चर्चा होणारच.

employee fired for being late
Tarapur MIDC: तारापूर एमआयडीसीत पुन्हा वायूगळती; औद्योगिक सुरक्षेवर गंभीर प्रश्न

रेडिटची पोस्ट व्हायरल

हे प्रकरण ज्यावेळी एका रेडिट युजरने याबाबत पोस्ट केली त्यावेळी समोर आलं. या पोस्टनुसार एक कर्मचारी गेल्या सात वर्षापासून कंपनीत काम करत होता. त्यावेळी तो कधी उशिरा आला नाही. मात्र एक दिवस तो पहिल्यांदाच २० मिनिटे लेट आला. यानंतर त्याला कंपनीनं नोकरीवरून काढून टाकलं.

employee fired for being late
Government Biometric Attendance: पाच दिवसांचा आठवडा केला तरी कर्मचारी मात्र लेट लतिफ

सहकाऱ्यांना काही दिसांनी कळालं

रेडिट पोस्टनुसार ही घटना मंगळवारी झाली होती. मात्र याची माहिती सहकाऱ्यांना काही दिवसांनी मिळाली. पोस्टमध्ये लिहिलं आहे की ही घटना मंगळवारी झाली अन् आम्हाला आता माहिती होत आहे. पहिल्यांदाच २० मिनिटे लेट आल्यामुळं त्याला नोकरीवरून काढून टाकलं आहे. या पोस्टमध्ये कंपनीचं नाव किंवा कर्मचाऱ्याचं नाव दिलेलं नाही.

employee fired for being late
Well work investigation : धनगरवाडीत झालेल्या विहीर कामांच्या तपासणीसाठी 5 पथकांची नियुक्ती

सहकाऱ्यांचा विरोध

पोस्ट लिहिणाऱ्या युजरने सांगितलं की आता कंपनीतील कर्मचारी त्याच्या समर्थनात उतरले आहेत. सहकाऱ्यांनी कंपनीच्या या निर्णयाचा विरोध करण्याचं ठरवलं आहे. युजर लिहितो की पुढच्या सोमवारी अजून सर्व कर्मचारी जाणून बुजून ऑफिसला लेट जाणार आहेत. जोपर्यंत कंपनी त्याला पुन्हा नोकरीवर घेत नाही तोपर्यंत असं करण्यात येईल.

employee fired for being late
Fake Disabled Employees Case: बोगस दिव्यांग प्रकरणात गैरहजर कर्मचाऱ्यांनाही ‘शो कॉज’; 41 अल्पदृष्टी कर्मचाऱ्यांची नव्याने तपासणी

सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा

हे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. अनेक लोकांनी कर्मचाऱ्याच्या समर्थनात प्रतिक्रिया दिली आहे. एका युजर लिहितो की एक चांगला कर्मचारी फक्त एक दिवस लेट आल्यामुळं काढला जात नाही. असं वाटतं की कंपनी त्याला आधीपासूनच हटवण्याच्या तयारीत होती. ते फक्त कारण शोधत होते.

employee fired for being late
Pune Gold Silver Rates: जागतिक तणावामुळे पुण्यात सोनं-चांदीच्या किमतीत जोरदार वाढ

सावधानतेचा दिला इशारा

काही लोकांनी सहकाऱ्यांना विरोध करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. विरोध करण्याचा निर्णय उलटा देखील पडू शकतो एका युजरने आपला अनुभव सांगितला की एक व्यक्ती चार वर्षात पहिल्यांदा १५ मिनिटे लेट आल्यावर त्याला नोकरीवरून काढून टाकलं होतं. दुसऱ्या एका युजरने ही घटना खूप कठोर असून हे टॉक्सिक वर्क कल्चरचं उदाहरण असल्याचं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news