Fake Disabled Employees Case: बोगस दिव्यांग प्रकरणात गैरहजर कर्मचाऱ्यांनाही ‘शो कॉज’; 41 अल्पदृष्टी कर्मचाऱ्यांची नव्याने तपासणी

जिल्हा परिषद प्रशासनाची कडक कारवाई; दिव्यांग प्रमाणपत्रांच्या पडताळणीला वेग
Fake Disability Certificate
Fake Disability CertificatePudhari
Published on
Updated on

नगर: जिल्हा परिषदेतील गाजत असलेले बोगस दिव्यांग़ प्रकरणात 19 जणांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतर काल गैरहजर असलेल्या 28 जणांनाही ‌‘शो कॉज‌’ देण्यात आली आहे. तर अल्पदृष्टी असलेले 41 कर्मचाऱ्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अल्पदृष्टी कर्मचारी देखील प्रशासनाच्या ‌‘दृष्टीक्षेपात‌’ आले आहेत.

Fake Disability Certificate
Ahilyanagar Municipal Blood Bank: कर्मचाऱ्यांअभावी अहिल्यानगर मनपाची रक्तपेढी दीड महिन्यांपासून बंद

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी शासनाच्या निर्देेशानसुार, दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्व व प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, जिल्हा रुग्णालयाने केलेल्या तपासणीत 19 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व हे संशयास्पद आढळले आहे. अनेक कर्मचाऱ्यांकडे 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र असताना, प्रत्यक्षात त्यांचे दिव्यांगत्व हे ‌‘शून्य‌’ असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Fake Disability Certificate
Jamkhed Crime | जामखेड येथे चाकू-काठीने मारहाण करुन एकाचा खून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, एक आरोपी अटकेत

याशिवाय काही कर्मचाऱ्यांचे ‌‘यूडीआयडी‌’ही नसल्याचे दिसले आहे. त्यामुळे संबंधितांना 10 दिवसांच्या आत आपला खुलासा सादर करण्याच्या सूचना सीईओंकडून करण्यात आल्या आहेत. यात, आता गैरहजर असलेल्या 27 कर्मचाऱ्यांनाही नोटिसा बजावण्याचा निर्णय सीईओंनी घेतला आहे.

Fake Disability Certificate
Jeur Solar Power Project Controversy: जेऊरमधील सौरऊर्जा प्रकल्पावर ग्रामस्थांचा आक्षेप; मनमानी व दडपशाहीचा आरोप

कर्णबधीर कर्मचाऱ्यांची तपासणी ससूनला?

कर्णबधीर 18 कर्मचारी आहेत. मात्र त्यांची तपासणी करण्यासाठी नाशिक येथे आवश्यक यंत्रसामुग्री नाही. त्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात पाठवले जाणार की अन्य कोठे, याबाबत प्रशासनाचा विचार सुरू असून, अद्याप निर्देश मिळाले नसल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी सांगितले.

Fake Disability Certificate
Ahilyanagar E-Waste Campaign: अहिल्यानगरमध्ये 23 फेब्रुवारीला ई-कचरा निर्मूलन अभियान; मनपाचे नागरिकांना आवाहन

आरोग्य उपसंचालकांनी घेतली दखल

जिल्हा रुग्णालयात अस्थिव्यंग व इतर दिव्यांगत्व असलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी केली गेली. मात्र, कर्णबधीर आणि अल्पदृष्टी कर्मचाऱ्यांच्या तपासणीबाबत जिल्हा परिषदेने आरोग्य उपसंचालकांकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यानुसार, अल्पदृष्टीचे प्रमाणपत्र असलेल्या ‌‘त्या‌’ 41 कर्मचाऱ्यांची नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. दि. 25, दि.27 फेब्रुवारी तसेच दि.4 मार्च असे तीन दिवस ही तपासणी होणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना तशा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news