

Elon Musk X will pay creators:
एलन मस्क यांनी एक्स प्लॅटफॉर्म हे कंटेट क्रिएटर्सना देण्यात येणारे पैसे वाढवण्याचा विचार करत आहे असे संकेत दिले. त्यांनी आपल्या खास शैलीत एका युजरला उत्तर देताना याचे संकेत दिले. सध्याच्या घडीला युट्यूबच्या मॉनिटायझेशन मॉडेलशी स्पर्धा करण्यासाठी एक्स प्लॅटफॉर्म कार करत आहे.
एलन मस्क यांनी एका 'X' युजरच्या कमेंटवर प्रतिक्रिया देताना मोठे संकेत दिले. या युजरने क्रिएटर्सचे पेआऊट वाढवण्याची मागणी केली होती. त्याने एलन मस्क यांना टॅग केलं होतं. त्यावर मस्क यांनी उत्तर देतांना प्रोडक्ट हेड निकिता यांना टॅग करून म्हटले, 'ओके चला करूयात मात्र आम्ही सिस्टमवर नो गेमिंग पॉलिसी सक्तीने लागू करणार आहोत.'
एलन मस्क यांच्या या ट्विटला निकीता यांनी देखील लगेच रिप्लाय दिला. त्या म्हणाल्या याच्यावर काम करत आहे. त्या पुढे लिहितात नवीन मेथर्ड ही ९९ टक्के फ्रॉड नष्ट करेल.' निकीता यांनी एन्गेजमेंट बेस पेआऊटमध्ये छेडछाड होत असल्याच्या शक्यतेवर भाष्य केलं आहे.
मस्क यांनी अनेक क्रिएटर्सच्या पोस्टवर उत्साहीपणे कमेंट केली होती. यात स्वतंत्र पत्रकार निक शेर्ली यांच्या पोस्टचा देखील समावेश होता. त्यांनी मिनिओस्टा येथील डे केअर फ्रॉड उजेडात आणला होता.
एक्स स्पर्धेत पिछाडीवर?
एक्स प्लॅटफॉर्म हा युट्यूबच्या अॅडसेन्ससोबत स्पर्धा करण्यात सध्या पिछाडीवर पडत आहे. यावर शेर्ली म्हणाले होते की, 'मी माझ्या मित्रांना काही महिन्यांपासून एक्सवर पोस्ट करा असं सांगत होतो. मात्र त्यांनी ते प्रयत्न केले नाहीत कारण त्यांच्या वेळेचा इतर प्लॅटफॉर्मवर चांगला उपयोग (आर्थिकदृष्ट्या) होत आहे.'
दरम्यान, एक्सवरील दुसऱ्या युजर्सच्या म्हणण्यानुसार एक्सने जर जास्त पैसे दिले तर ते गेम चेंजर ठरू शकतं. त्यामुळं अनेक विश्वासार्ह कंटेट आकर्षित करता येईल. सध्याच्या घडीला लार्ज लँग्वेज मॉडेल्स हे सध्या ऑनलाईन कंटेटवर जास्तकरून अवलंबून आहेत.
यापूर्वी मस्क यांनी एक्सने त्यांचे क्रिएटर कॉम्पेनसेशन स्पर्धक युट्यूबपेक्षा अजून वाढवलं पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. ऑक्टोबर महिन्यात त्यांनी एक्स क्रिएटर्सना कमी पैसे देत आहेत आणि आणि उत्पन्नाचा वाटा देखील अचूकपद्धतीनं दिला जात नाहीये. यावेळी त्यांनी युट्यूब हे काम चांगल्या पद्धतीनं करत आहे असं मान्य देखील केलं होतं.
एक्स क्रिएटर्स मॉनिटायजेशन प्रोग्राम हा मस्क यांनी ट्विटर प्लॅटफॉर्म विकत घेतल्यानंतर लाँच करण्यात आला होता. सध्याच्या घडीला फक्त पात्र, व्हेरिफाईड युजर्ससाठीच अॅड रेव्हेन्यू शेअर एन्गेजमेंटच्या बेसिसवर केला जातोय.