कोल्हापूर : ‘पुढारी’ एज्युदिशा प्रदर्शनाचे आयोजन; विद्यार्थ्यांना शैक्षणिक भविष्याचा अचूक वेध घेता येणार

कोल्हापूर : ‘पुढारी’ एज्युदिशा प्रदर्शनाचे आयोजन; विद्यार्थ्यांना शैक्षणिक भविष्याचा अचूक वेध घेता येणार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: शिक्षणाबरोबरच करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध करून देणार्‍या दै. 'पुढारी' एज्युदिशा प्रदर्शनाची विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये कायम उत्सुकता असते. 2022 मध्ये 28 ते 30 मे या कालावधीत हे प्रदर्शन डॉ. व्ही. टी. पाटील मेमोरिअल हॉल, राजारामपुरी, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. कोल्हापूरसह सातार्‍यात अलंकार हॉल, पोलिस करमणूक केंद्र येथे दि. 3 ते 5 जून, सांगलीमध्ये जैन कच्छी भवन येथे दि. 10 ते 12 जूनदरम्यान हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी असोसिएट स्पॉन्सर आय. आय. बी. क्लासेस, लातूर आणि सहप्रायोजक डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, कोल्हापूर, प्रा. मोटेगावकर सरांचे रेणुकाई करिअर सेंटर, लातूर, आर. सी. सी., सिम्बायोसिस स्कील्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे यांचे सहकार्य लाभले.

भविष्याचा अचूक वेध घेणारे हे भव्य शैक्षणिक प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरतो. या वळणावर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची करिअरची दिशा ठरते. या स्थितीत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची अवस्था गोंधळलेली असते. अशा द्विधा मन:स्थितीत सापडलेल्या विद्यार्थी व पालकांना 'एज्युदिशा' या शैक्षणिक प्रदर्शनातून परिपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे.

प्रदर्शनात नामवंत शिक्षण संस्थांचा समावेश असून, करिअरविषयक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय आपल्या शिक्षण आणि गुणवत्तेनुसार करिअरच्या अगणित संधी एकाच ठिकाणी उपलब्ध होणारी संधी दै. 'पुढारी' च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

प्रदर्शनात नामांकित मान्यताप्राप्त विद्यापीठे, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसचे स्टॉल्स यांचा समावेश असणार आहे.
अ‍ॅग्रीकल्चर, हॉटेल मॅनेजमेंट, अ‍ॅनिमेशन, बायो टेक्नॉलॉजी, फायर इंजिनिअरिंग, नॅनो टेक्नॉलॉजी, स्पर्धा परीक्षा, डिस्टन्स लर्निंग आदींबाबतच्या माहितीचा खजिना मिळणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : राहुल ः 8805007381, सनी ः 9922930180, प्रणव ः 9404077990, परितोष ः 9766213003.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news