Maharashtra Board Exam 2027: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, पाहा पूर्ण वेळापत्रक

Maharashtra Board Exam 2027: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने 2027 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे.
Maharashtra Board Exam 2027
Maharashtra Board Exam 2027Pudhari
Published on: 
Updated on: 

Maharashtra Board Exam 2027: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2027 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 18 मार्चपर्यंत चालणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 15 मार्च 2027 रोजी संपणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दरवर्षी राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. यंदाही पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांअंतर्गत परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. मंडळाने या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध केले असून विद्यार्थ्यांना त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे.

बारावीची परीक्षा 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे लेखी परीक्षा 8 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. ही परीक्षा 18 मार्च 2027 पर्यंत चालणार आहे. परीक्षेपूर्वी होणाऱ्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षांचेही वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

बारावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2027 या कालावधीत होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेपूर्वीच प्रात्यक्षिक परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे.

Maharashtra Board Exam 2027
Gold Silver Price Today: धनत्रयोदशी संपताच सोन्याला उतरती कळा! भावात २,५०० रुपयांची घसरण; चांदीही झाली स्वस्त

दहावीची बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारीपासून

दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहे. ही परीक्षा 15 मार्च 2027 पर्यंत चालणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2027 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेच्या आधी होणाऱ्या या परीक्षांचीही तयारी करणे आवश्यक आहे.

दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक

परीक्षेचा तपशील - तारीख

  • बारावी लेखी परीक्षा - 8 फेब्रुवारी ते 18 मार्च 2027

  • बारावी प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा - 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2027

  • दहावी लेखी परीक्षा - 15 फेब्रुवारी ते 15 मार्च 2027

  • दहावी प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा - 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2027

Maharashtra Board Exam 2027
Dhanteras Investment Trends: धनत्रयोदशीला Gen Z चा नवा ट्रेंड! सोने-चांदी सोडून तरुण कुठे गुंतवत आहेत पैसा?

विद्यार्थ्यांनी वेळापत्रक काळजीपूर्वक तपासावे

बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या विषयांच्या परीक्षांच्या तारखा आणि वेळा काळजीपूर्वक तपासाव्यात. परीक्षेच्या तयारीसाठी उपलब्ध असलेल्या वेळेचे योग्य नियोजन करावे. तसेच प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षांच्या तारखांकडेही दुर्लक्ष करू नये.

विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून विषयानुसार सविस्तर वेळापत्रक तपासावे. परीक्षेसंदर्भातील अधिकृत सूचनांसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरील माहितीच ग्राह्य धरावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.