NEET Exam : 'नीट'ला पुन्‍हा एकदा मुख्‍यमंत्री विजय यांचा तीव्र विरोध, नंदन नीलेकणींकडे कोणती मागणी केली?

परीक्षा सुधारणा समितीला नीट व तत्‍सम परीक्षा रद्‍द करण्‍याची करणार मागणी

NEET exam cancellation demand Tamil Nadu :
नीट परीक्षेसंदर्भात तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय नंदन नीलेकणींसमोर मोठी मागणी केली आहे. Pudhari
Published on: 
Updated on: 

NEET exam cancellation demand Tamil Nadu : तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी केंद्र सरकारच्या वैद्यकीय प्रवेश अभ्‍यासक्रमांसाठीच्‍या 'नीट' (NEET) आणि तत्सम प्रवेश परीक्षा रद्द करण्याची शिफारस केली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांसह उच्च शिक्षणातील प्रवेशासाठी १२ वीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांचाच आधार घेतला जावा, अशी भूमिका तामिळनाडू सरकारने घेतली आहे.

नंदन निलेकणी यांच्या समितीसमोर मांडली मागणी

मुख्यमंत्री विजय यांनी बुधवारी (दि. ४ नोव्हेंबर) चेन्नई येथील सचिवालयात नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखालील परीक्षा सुधारणाविषयक उच्चस्तरीय कार्यदलाच्या सदस्यांची भेट घेतली. या बैठकीत तामिळनाडू सरकारने 'नीट' परीक्षेला आपला विरोध पुन्हा एकदा दर्शवला. वैद्यकीय तसेच इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अशा प्रवेश परीक्षा बंद करण्याची शिफारस केली. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसह सर्व सार्वजनिक परीक्षांचे आयोजन, सुरक्षा, पारदर्शकता आणि एकूणच परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी शिफारसी देण्याचे काम या कार्यदलाकडे सोपवण्यात आले आहे.


NEET exam cancellation demand Tamil Nadu :
NEET SS 2026 Registration: डॉक्टरांसाठी सुपर स्पेशालिटीची संधी! नीट एसएस २०२६ नोंदणी सुरू; १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

१२ वीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेशाची केली मागणी

वैद्यकीय अभ्यासक्रमांमधील प्रवेश १२ वीच्या बोर्ड परीक्षेतील गुणांच्या आधारे असावेत, अशी मागणी तामिळनाडू सरकारने केली आहे. 'नीट'सारख्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी लागणारे महागडे कोचिंग अनेक विद्यार्थ्यांसमोर मोठी आर्थिक अडचण निर्माण करते. ग्रामीण भागातील, सरकारी शाळांमधील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना समान संधी मिळणे आवश्यक आहे. प्रवेश निश्चित करताना विद्यार्थ्यांच्या शालेय शैक्षणिक कामगिरीला अधिक महत्त्व दिले जावे, अशी भूमिका तामिळनाडू सरकारने राज्‍य सरकारसमोर मांडली आहे.

तामिळनाडू विधानसभेत ठराव मंजूर

११ ऑगस्ट २०२६ रोजी तामिळनाडू विधानसभेने 'नीट' परीक्षेच्या विरोधात एक ठराव मंजूर केला होता. नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखालील समितीसमोर आपली मागणी मांडताना राज्य सरकारने या ठरावाचाही उल्लेख केला. वैद्यकीय प्रवेशासाठी संपूर्ण देशासाठी एकच प्रवेश परीक्षा घेण्याच्या पद्धतीला तामिळनाडूचा दीर्घकाळापासून विरोध असल्‍याचेही स्‍पष्‍ट केले.


NEET exam cancellation demand Tamil Nadu :
CJI Surya Kant : 'सध्या आंदोलनांचा काळ सुरू आहे...' : आरक्षणाबाबतच्या याचिकेवरील सुनावणीवेळी सरन्यायाधीश नेमकं काय म्हणाले?

नंदन निलेकणींच्‍या नेतृत्त्‍वाखालील समिती तयार करणार शिफारसी

तमिळनाडू सरकारने 'नीट' (NEET) परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे, परंतु केंद्र सरकारने ही परीक्षा रद्द करण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखालील एक कार्यगट परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी शिफारसी तयार करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.