Sanjeev Kapoor on Kolhapur food: कोल्हापूर भारतातील 'मोस्ट अंडररेटेड' फूड सिटी; संजीव कपूर यांना सर्वात जास्त काय आवडलं?

Sanjeev Kapoor on Kolhapur food:
Sanjeev Kapoor on Kolhapur food:pudhari
Published on
Updated on

Sanjeev Kapoor on Kolhapur food: भारतातील खाद्यसंस्कृतीबद्दल बोलताना नेहमीच दिल्ली, मुंबई किंवा लखनौचा उल्लेख केला जातो. मात्र, प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी एका मुलाखतीमध्ये कोल्हापूर शहराचा उल्लेख 'मोस्ट अंडररेटेड फूड सिटी' असा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे कोल्हापूरच्या अस्सल तांबडा-पांढरा रस्सा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Sanjeev Kapoor on Kolhapur food:
Goa Of The Record | डीएनए म्हणजे काय रे भाऊ?

एएनआय पॉडकास्टमध्ये मोठा खुलासा

प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी एएनआय (ANI) च्या पॉडकास्टमध्ये स्मिता पारेख यांना दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. जेव्हा स्मिता पारेख यांनी त्यांना भारतातील सर्वात अंडररेटेड खाद्य शहर कोणते, असा प्रश्न विचारला, तेव्हा कपूर यांनी विचारपूर्वक कोल्हापूर हे नाव घेतले.

Sanjeev Kapoor on Kolhapur food:
Goa Off The Record | ऑफ दि रेकॉर्ड

सुरतवर स्पष्ट मत

मुलाखतीदरम्यान जेव्हा सुरत शहराचा संदर्भ आला, तेव्हा संजीव कपूर यांनी स्पष्टपणे सांगितले की, सुरतचे जेवण कोणत्याही प्रकारे 'अंडररेटेड' नाही. उलट अनेक लोक तिथे जेवणासाठी जातात, त्यामुळे त्याला 'ओव्हररेटेड' म्हणता येईल. परंतु कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीला जी प्रसिद्धी मिळायला हवी होती, ती अजूनही मिळालेली नाही, असे त्यांना वाटते.

Sanjeev Kapoor on Kolhapur food:
Goa Cashew Festival 2026 | गोव्याच्या काजूचा दरवळ जगभर पसरणार! 10 ते 12 एप्रिल दरम्यान पणजीत रंगणार भव्य 'काजू महोत्सव'

कोल्हापुरी रश्श्याची भुरळ

संजीव कपूर यांनी कोल्हापुरी मांसाहारी पदार्थांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, "कोल्हापुरी मटन आणि तिथे मिळणारा तांबडा-पांढरा रस्सा हे पदार्थ खरोखरच 'आऊटस्टँडिंग' आहेत. दुर्दैवाने या पदार्थांबद्दल महाराष्ट्राबाहेर फार कमी लोकांना माहिती आहे."

Sanjeev Kapoor on Kolhapur food:
Omkar Elephant | पेडणेकरांची झोप उडाली! 'ओंकार' हत्तीचे मोप परिसरात पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

संजीव कपूर यांच्यासारख्या जागतिक ख्यातीच्या शेफने कोल्हापूरच्या जेवणाची दखल घेतल्याने, आता कोल्हापूरची ही चव केवळ महाराष्ट्रच नव्हे तर जगभरातील खवय्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे. अस्सल कोल्हापुरी बेत आणि तिथली आदरातिथ्य करण्याची पद्धत ही खरोखरच वेगळी असल्याचे त्यांनी या मुलाखतीतून अधोरेखित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news